काय नाचल्यात काकू, एक नंबर! असा व्हिडीओ कधीच पाहिला नसेल, पाहाच…

विशेषत: असे मजेशीर डान्स अनेकदा लग्नसमारंभात पाहायला मिळतात. सध्या असाच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यात एक मावशी साडी घालून डान्स करताना दिसत आहे.

काय नाचल्यात काकू, एक नंबर! असा व्हिडीओ कधीच पाहिला नसेल, पाहाच...
Dance Videos
Image Credit source: Dance Videos
| Updated on: May 10, 2023 | 11:30 AM

मुंबई: सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात, त्यातील काही लोकांचं मनोरंजन करतात तर काही त्यांना भावूकही करतात. त्याचबरोबर असे अनेक व्हिडिओ आहेत जे पाहून लोक हैराण होतात. डान्सशी संबंधित व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. असे अनेक नृत्य आहेत जे पाहिल्यानंतर लोकांना आनंद मिळतो. तर अनेक नृत्ये पाहून लोक खूप हसतात. विशेषत: असे मजेशीर डान्स अनेकदा लग्नसमारंभात पाहायला मिळतात. सध्या असाच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यात एक मावशी साडी घालून डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ढोल वाजत आहेत. एक महिला ढोल-ताशांच्या तालावर नाचायला लागते. एरवी मिरवणूक निघत असेल तर अनेक स्त्रिया एकत्र नाचताना दिसतात, पण इथे एका महिलेने सर्वांची उणीव भरून काढली आहे. तिला बघणारेसुद्धा फक्त बघत राहतात. या स्त्रीचा आत्मविश्वासही पाहण्याजोगा आहे आणि ऊर्जाही पाहण्यासारखी आहे. डान्स करताना तिने कमालीची एनर्जी दाखवली आहे.

आंटीचा हा मजेशीर डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर _adit_xs नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 5.8 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे, तर 58 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने मजेशीर पद्धतीने लिहिले आहे की, ‘भूकंप येत आहे’, तर दुसऱ्या युजरने ‘छोटा भीम आणि चुटकीच्या लग्नात टुनटुन मौसी डान्स करत आहे’, असे लिहिले आहे. त्याचप्रमाणे एका युजरने ‘आंटी पूर्ण आत्मविश्वासात आहे’, असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या युजरने ‘आंटीच्या एनर्जीला सलाम’ असं लिहिलं आहे.