
भारतात कोरोना विषाणूचे (COVID-19) रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढलेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1000 च्या घरात पोहचली आहे. त्यातच जपानची बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीने सुद्धा त्याविषयी भाकीत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध मंगा कलाकार रियो तात्सुकी (Ryo Tatsuki) ही जपानची बाबा वेंगा म्हणून ओळखली जाते. रिओच्या भाकितानुसार, 2030 मध्ये एक घातक विषाणू पुन्हा एकदा थैमान घालेल. त्यापूर्वीच कोविडच्या ओमिक्रॉनच्या चार सब व्हेरिएंटने भारतात धुमशान घातले आहे.
10 वर्षानंतर विषाणूचे थैमान
1999 मध्ये ‘द फ्यूचर एज आई सी इट’ हे पुस्तक रिओ तात्सुकीने लिहिले होते. त्यावेळी हे पुस्तक म्हणजे फँटसी म्हणून ओळखल्या जात होते. या पुस्तकात तिने तिला पडलेली स्वप्न रेखाटली होती. त्याचे चित्रबद्ध आणि शब्दबद्ध केले होते. त्यात तिने जपानमध्ये मोठी त्सुनामी येण्याचा दावा केला होता. 2011 मध्ये तशीच त्सुनामी आली आणि जग हादरले. त्याच पुस्तकात पुढील त्सुनामी आणि 2020 मध्ये एक अज्ञात विषाणू जगाला हादरवून सोडेल. जगाचा वेग मंदावेल असे भाकीत होते. या घटना घडल्याने अनेकांचा तिच्यावर विश्वास बसला. आता तिने 2020 नंतर 10 वर्षांनी पुन्हा जगाला विषाणूचा सामना करावा लागेल असे भाकीत केले होते. 2030 मध्ये हा विषाणून थैमान घालेल असे भाकीत तिने वर्तवलेले आहे.
आरोग्य यंत्रणा उद्ध्वस्त करणार
बाबा वेंगाच्या नवीन व्हायरल भविष्यवाणी नुसार, 10 वर्षांनी हा व्हायरस अधिक घातक ठरेल. तो नव्या दमाने पुन्हा येईल आणि यावेळी तो अनेकांचा जीव घेईल. रिओच्या पुस्तकानुसार हे जागतिक संकट असेल. या नव्या व्हायरसमुळे जगाची आरोग्य यंत्रणा ध्वस्त होईल. आधुनिक आरोग्य विज्ञानाचे दावे खोटे ठरतील. सध्याचा कोविड-19 हा गंभीर नसल्याचा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी केला आहे. हा ओमीक्रॉनचा सब व्हेरिएंट असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे त्सुनामीविषयी काहीच भूगर्भीय हालचाली नसल्याचे जपानच्या हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.