AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजीने गुपचूप केली नातीची DNA चाचणी, मग 17 वर्षांपूर्वीचे ते सत्य आले समोर, इतक्या वर्षांपासून सूनेने ठेवले होते दडवून  

DNA Test : प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही गुपित असतंच. ते आपण एकतर कुणाला सांगत नाही अथवा अगदी जवळच्याच व्यक्तीशी शेअर करतो. इथं तर 17 वर्षांपूर्वीचे ते सत्य बाहेर आले. काय घडली घटना, काय होते ते सत्य?

आजीने गुपचूप केली नातीची DNA चाचणी, मग 17 वर्षांपूर्वीचे ते सत्य आले समोर, इतक्या वर्षांपासून सूनेने ठेवले होते दडवून  
डीएनए चाचणीImage Credit source: गुगल
| Updated on: May 28, 2025 | 5:24 PM
Share

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही गुपितं असतात, ती मरेपर्यंत काही जण सांगत नाही. तर काही जण ते गुपीत स्वतःसोबतच घेऊन इहलोक सोडतात. तर अशी रहस्य केवळ काही लोकांनाच सांगण्यात येतात. असेच एक रहस्य या जोडप्याने काळजाच्या खोल कप्प्यात दाबून ठेवले होते. या जोडप्याच्या मुलीचा चेहरा हा वडिलांशी कसाच जुळत नव्हता. ही गोष्ट वडिलांच्या आईला सतत खटकत होती. त्यामुळे तिने मुलीची डीएनए चाचणी करून घेतली. त्यातून जे रहस्य समोर आले, त्याने हे कुटुंब हादरले. काय होते ते रहस्य?

समाज माध्यमावरील ती कथा काय?

सोशल मीडिया प्लेटफॉर्म रेडिट के ग्रुप r/TrueOffMyChest वर जवळपास 3 वर्षांपूर्वी एका युझर @throwawayAK77 ने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तिने ही कथा त्याच्याशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या सासूने तिला, मुलांना जेवायला बोलावले. त्यावेळी तिने पती आणि तिच्या हातात एक लिफाफा दिला. त्यात एक DNA Test चा रिपोर्ट होता. ज्यावेळी दोघांनी हा अहवाल वाचला. त्या दोघांना मोठा धक्का बसला. कारण हा डीएनए रिपोर्ट त्यांच्या 17 वर्षीय मोठ्या मुलीचा होता. त्यानुसार, या मुलीचा तिच्या वडिलांशी कुठलाही संबंध नव्हता. ती दुसऱ्या कुणाची तरी मुलगी होती.

MIL DNA tested my daughter without our consent, and proved she isn’t my husbands byu/throwawayAK77 inTrueOffMyChest

कुटुंबाला बसला धक्का

17 वर्षानंतर हे सत्य समोर आल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्या मुलीला सुद्धा या प्रकाराने अस्वस्थ झाल्यासारखे झाले. ही मुलगी या कुटुंबातील नाही हे सूनेने इतक्या वर्षांपासून मनात दाबून ठेवले होते. पण तिच्या पतीला ही गोष्ट तिने अगोदरच सांगितली होती. जवळपास 18 वर्षांपूर्वी या सूनेच्या माहेरी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. या चोरट्यांनी सोने-नाणे चोरले. घरात नासधूस केली. त्यातील एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या दोघांच्या लग्नानंतरच ही घटना घडली होती. त्यानंतर तिला ती गर्भवती असल्याचे जाणवले. तिने ही गोष्टी नवऱ्याला सांगितली. तिने होणाऱ्या बाळाची डीएनए चाचणीचा पर्याय नवऱ्यासमोर ठेवला. पण नवऱ्याने तिला नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये यावर चर्चा झाली नाही. या मुलीनंतर या जोडप्याला दोन मुलं सुद्धा झाली.

घरात ही गोष्ट माहिती झाल्यावर पत्नीला नवऱ्यावर तर मुलीला आपल्या पित्याचा अभिमान वाटला. कारण त्याला ही गोष्ट माहिती असूनही त्याने या जगात येण्यापासून तिला रोखलं नाही. तर कुटुंबातील इतर सदस्यांनी हळूहळू ही गोष्ट स्वीकारली. सासूने या धक्क्यातून अजूनही सावरलेली नाही. अनेक युझर्सनी त्या महिलेला पाठिंबा दिला आहे. तर तिच्या पतीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.