AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! Pak चा युद्धविरामासाठी आटापिटा, एकदा नाही तर केला दोनदा कॉल! ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठी जीवितहानी, आता दिली कबुली

Operation Sindoor Pakistan : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये मयतांचा आकडा वाढला आहे. दहशतवाद्यांसोबत त्यांचे आका आणि अब्बाजान आणि लष्कराचे अधिकारी ठार झाले. नवीन आकड्यांमुळे पाक सरकारमध्ये सन्नाटा पसरला आहे.

मोठी बातमी! Pak चा युद्धविरामासाठी आटापिटा, एकदा नाही तर केला दोनदा कॉल! ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठी जीवितहानी, आता दिली कबुली
ऑपरेशन सिंदूरImage Credit source: गुगल
| Updated on: May 28, 2025 | 3:39 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर न्यायासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूरने पाकड्यांचे कंबरडे मोडले. बहावलपूरपासून ते मुरिदकेपर्यंत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले. त्यानंतर पाकिस्ताने भारताच्या रहिवाशी ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला. चौथ्याच दिवशी भारताच्या माऱ्यापुढे पाकिस्तान झुकला. त्याने युद्धविरामासाठी गुडघे टेकवले. आता या युद्धविरामाविषयी नवीन खुलासा समोर आला आहे. तर मृतांचा आकडा सुद्धा वाढल्याचे समोर आले आहे.

पाकड्यांचा दोनदा कॉल

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, भारताने युद्धविराम करण्यासाठी एकदा नाही तर दोनदा भारताशी संपर्क साधला होता. पाकिस्तानने पहिल्यांदा 7 मे रोजी संध्याकाळी भारतासोबत युद्धबंदीसाठी संपर्क केला होता. पाकिस्तानच्या लष्करी देखरेख,ऑपरेशन्सचे महासंचालकांनी (Director General of Military Operations-DGMO) भारताशी संपर्क साधला होता. 7 मे रोजीच भारतीय लष्करी कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाण्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर 10 मे रोजी 3.35 मिनिटांनी डीजीएमओ स्तरावर चर्चेला सुरुवात झाली. त्यावर दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दिली. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी ही सैन्य दलातील संपर्क माध्यमाद्वारे ही चर्चा झाली. यापूर्वी सुद्धा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पत्र परिषदेत याविषयीचा उल्लेख केला होता. पाकिस्तानच्या डीजीएमओने युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवल्याचे ते म्हणाले होते.

ऑपरेशन सिंदूरचा तडाखा, मृताचा आकडा वाढला

ऑपेरशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमध्ये मयताचा आकडा वाढला आहे. आता 160 जण भारताच्या हल्ल्यात ठार झाल्याचे समोर आले आहे. बहावलपूर येथील हल्ल्यात 20 हून अधिक जण ठार झाले. त्यातील मरणारे हे दहशतवादी मसूद अझहरचे नातेवाईक होते. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि सैनिक मिळून 40 जण ठार झाले आहेत. पाकिस्तान हा आकडा 11 सांगत आहे.

पाकड्यांना अनेक अब्ज डॉलरचा फटका

पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे. एअरस्पेस आणि विमानतळ बंद असल्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची गती एकदम मंदावली. एका अंदाजानुसार, या सर्व कारावाईत पाकिस्तानला अनेक अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकसान झाल्याचे कबूल केले आहे. अर्थात अजून अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही.

..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.