
जर तुम्हाला लोकप्रिय व्हायचे असेल तर असे काही करा की लोक तुम्हाला विसरता कामा नये. काही असाच कारनामा कानपूर येथील एका ब्युटीपार्लर सुरू करणाऱ्याने केला आहे. या ब्युटी पार्लरचे नाव वाचताच तुमच्या अंगावर शिरशिरी येईल. महिला या ब्युटीपार्लरमध्ये जातीलच कशाला, असा तुम्हाला पण प्रश्न पडेल. या ब्युटी सलोनचे नाव तुम्ही कधी विसरणार नाही. या ब्युटी पार्लरचे नाव कोणीच विसरू शकत नाही असे आहे. हे नाव वाचताच पहिल्यांदा तुम्ही खुदकन हसाल आणि नंतर म्हणाल प्रसिद्धीसाठी काहीही करतात लोक.
असे काय नाव?
तर या ब्युटी पार्लरचे नाव एकदम हटके आहे. हे नाव वाचून तरुणी, महिला या ब्युटी सलोनमध्ये जाणार नाहीत. ते या सलोनमध्ये जाण्याचा सुद्धा विचार करणार नाहीत. जिथे ब्युटी पार्लरचे नाव लूक्स, ग्लॅमर वा शाईन असे ट्रेंडिंग नाव ठेवले आहे. तर या ब्युटी पार्लरचे नाव बंदरिया ब्युटी सलोन असे ठेवले आहे. हो अगदी बरोबर बंदरिया असे नाव त्याने ब्युटी पार्लरला दिले आहे. त्यामुळेच एकच हश्या पिकला आहे.
ब्युटी पार्लर एकदम चर्चेत
हे ब्युटी सलून त्याच्या या हटके नावाने चर्चेत आले आहे. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर एकदम व्हायरल झाला. या व्हिडिओत, एक ब्युटी सलोन एका चिंचोळ्या गल्लीत असल्याचे दिसते. हे ब्युटी पार्लर एका घराचा भाग दिसते. बाहेरून पाहिल्यावर हे सलोन काही एकदम खास दिसत नाही. पण त्याचे नावच असे आहे की हसू आल्याशिवाय राहत नाही. तर या नावामुळे कोणी ग्राहक या सलोनमध्ये खरंच येईल का असा सवाल करण्यात येत आहे. एका माणसाने या ब्युटी पार्लरचा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर अपलोड केला आणि तो पाहता पाहता व्हायरल झाला. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 17 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. त्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.