रेल्वेच्या महिला तिकीट तपासनीसचा विक्रम, 1 कोटी रुपयांचा दंड वसूल केल्यानंतर, रेल्वे मंत्रालय म्हणाले…

सध्या हे ट्वि्ट आणि त्यामध्ये असलेले फोटो चांगलेचं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती रोजलिन अरोकिया मैरी यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

रेल्वेच्या महिला तिकीट तपासनीसचा विक्रम, 1 कोटी रुपयांचा दंड वसूल केल्यानंतर, रेल्वे मंत्रालय म्हणाले...
Rosaline Arokia Mary
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 24, 2023 | 10:03 AM

मुंबई : दक्षिण रेल्वेच्या (Southern Railway) एका मुख्य तिकीट तपासणीस (chief ticket inspector) रोजलिन अरोकिया मैरी (Rosaline Arokia Mary) यांनी इतका दंड वसूल केला आहे की, त्यांची सगळीकडे चर्चा सुरु आहे. ज्या लोकांनी तिकीट काढली नाही अशा लोकांकडून त्यांनी 1.03 रुपयांचा दंड वसूल केल्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून त्यांचं कौतुक करण्यातं आलं आहे. त्याचबरोबर या गोष्टीची लोकांना माहिती देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत ट्विटकडून माहिती देण्यात आली आहे.

कसल्याही प्रकारची हयगय केलेली नाही

भारतीय रेल्वेने पोस्टच्या कॅप्शनमध्ये, आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारची हयगय केलेली नाही. GMSRailway च्या CTI (मुख्य तिकीट निरीक्षक) श्रीमती रोझलिन अरोकिया मेरी या अनियमित/नॉन-रेग्युलर तिकीट असलेल्या प्रवाशाकडून 1.03 कोटी रुपये वसूल करणारी भारतीय रेल्वेची पहिली महिला तिकीट तपासणी कर्मचारी बनली आहे असं त्यांनी ट्विट केलं आहे.

महोदय, चांगलं कामं केलं

ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या चांगलीचं व्हायरल झाली आहे. कारण एका महिलेने आपलं कर्तव्य बजावत असताना कसल्याची प्रकारची सूट दिलेली नाही. ट्विटरवरती अनेक वापरकर्त्यांनी या चांगल्या कामासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, त्यांना शुभेच्छा आहेत. तर दुसऱ्या वापरकर्त्याने शुभेच्छा आहेत महोदय, चांगलं कामं केलं.

सध्या हे ट्वि्ट आणि त्यामध्ये असलेले फोटो चांगलेचं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती रोजलिन अरोकिया मैरी यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना शुभेच्छा सुध्दा देण्यात येत आहेत. त्याचबरोबर अनेक लोक कौतुक देखील करीत आहेत.