VIDEO : दुचाकीस्वाराचा गर्लफ्रेंडला पुढे बसवत रोमॅंटिक स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत, म्हणतात हा तर वेडेपणा’

मजा-मस्ती यासाठी काही तरुण-तरुणी काहीही वेडेपणा करतात. यामध्ये ते आपल्यासह इतरांच्या जीवाचीही परवा करत नाहीत. असाच एक वेडेपणाचा स्टंट भोपाळमधून समोर आला आहे.

VIDEO : दुचाकीस्वाराचा गर्लफ्रेंडला पुढे बसवत रोमॅंटिक स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत, म्हणतात हा तर वेडेपणा
दुचाकीवर प्रेमीयुगलाचा स्टंट व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 4:50 PM

भोपाळ : तारुण्याच्या जोशात लोक काहीही करतात. त्यात प्रेमात असलेल्यांना तर आजूबाजूच्या जगाचं भानही राहत नाही. अशाच एका बेभान प्रेमयुगलाचा खतरनाक बाईक स्टंट व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हालाही हे प्रेम आहेका? वेडेपणा? असा प्रश्न पडेल. हा स्टंट भोपाळच्या व्हीआयपी रोडवर करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये धावत्या दुचाकीवर हे प्रेमीयुगुल रोमान्स करत आहे. तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला मागच्या सीटवर बसवण्या ऐवजी पुढे टाकीवर बसवत तुफान वेगात बाईक चालवली आहे. या 13 सेकंदाच्या व्हिडिओत धावत्या बाईकवर तरुणीने अगदी गठ्ठ मिठी मारली आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ एका कार चालकानं शूट केला आहे.

पोलिस तरुणाच्या मागावर

हा व्हिडीओतील तरुण करत असलेल्या वेडेपणाला अनेकांनी नावं ठेवली आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने पोलिसांपर्यंतही हा व्हिडीओ पोहचला आहे. त्यामुळे पोलिसांनीही या व्हिडीओची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. सध्या पोलिस संबंधित रोडरील सीसीटीव्ही फुटेजचा वापर करुन बाईकच्या नंबर प्लेटवरुन तरुणाचा शोध घेत आहेत. उत्तर विभागाचे एसपी विजय खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाचा शोध घेण्यात येत असून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसंच अशाप्रकारचे स्टंट करण टाळाव असं आवाहनही खत्री यांनी केलं आहे.

इतर बातम्या :

Video | तरुणीचा तरुणासोबत स्टंट, पण मध्येच घडला विचित्र प्रकार, पाहा व्हिडीओ

Video | लबाड कावळ्याचा चक्रावून सोडणारा कारनामा, चक्क पैशांची करतो चोरी, व्हिडीओ व्हायरल

Video | आधी ट्रक चालकाशी वाद, नंतर स्वीकारली लाच, पैसे खिशात टाकतानाचा ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

(Bhopals Vip Road Couples bike romantic stunt video went viral)