Video | लबाड कावळ्याचा चक्रावून सोडणारा कारनामा, चक्क पैशांची करतो चोरी, व्हिडीओ व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 04, 2021 | 7:37 PM

या व्हिडीओमध्ये एका कावळ्याने चक्क चोरी केली आहे. ही चोरीक काही साधारण नाहीये. तर आपल्या चोचेमध्ये त्याने चक्क पैसे चोरून आणले आहेत.

Video | लबाड कावळ्याचा चक्रावून सोडणारा कारनामा, चक्क पैशांची करतो चोरी, व्हिडीओ व्हायरल
crow viral video

Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर प्राणी आणि पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातीला काही व्हिडीओ मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण थक्क होऊन जातो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका कावळ्याचा आहे. या व्हिडीओमध्ये कावळ्याने केलेली करामत पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. (vicious crow brings currency note video funny video went viral on social media)

एका कावळ्याने चक्क चोरी केली

कावळा हा बुद्धामान पक्षी असल्याचे आपण यापूर्वी ऐकले असेल. कावळ्याच्या कुशाग्र बु्द्धीचे अनेक दाखले प्रसिद्ध आहेत. सध्या मात्र एक कावळा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या कावळ्याने चक्क चोरी केली आहे. ही चोरी काही साधारण नाहीये. तर आपल्या चोचेमध्ये त्याने चक्क पैसे चोरून आणले आहेत.

कावळा घरात पैसे घेऊन आला

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कावळा एका खिडकीतून आल्याचे आपल्याला दिसत आहे. खुल्या खिकडीमधून कावळ्याने घरात झेप घातलीय. त्याच्या चोचीमध्ये काहीतरी असल्याचं आपल्याला सुरुवातीला दिसतंय. त्याच्या चोचेमध्ये नेमकं काय असावं ? हा प्रश्न आपल्याला सुरुवातीला पडतोय. मात्र, घरात घुसल्यानंतर थोड्या वेळानंतर कावळ्याच्या चोचेमध्ये पैसे असल्याचे आपल्याला दिसून येतंय.

पाहा व्हिडीओ :

नेटकरी म्हणतात, असा कावळा आम्हाला कधी भेटेल

हा कावळा बाहेरचे पैसे घरात घेऊन येत असल्यामुळे लोकांना तो चांगलाच आवडला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. असा कावळा कुठ भेटेल असं अशी विचारणा अनेक नेटकऱ्यांनी केली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर bestvirallvideos या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | हातात काठी घेऊन कोंबड्याची खोड काढली, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

Video | आधी ट्रक चालकाशी वाद, नंतर स्वीकारली लाच, पैसे खिशात टाकतानाचा ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

‘Bella Ciao’चा ताल अन् डालीच्या वेशात कोरोना लस घेण्याचं आवाहन, पुण्याच्या रस्त्यावर दिसणारे ‘ते’ नेमके कोण?

(vicious crow brings currency note video funny video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI