‘Bella Ciao’चा ताल अन् डालीच्या वेशात कोरोना लस घेण्याचं आवाहन, पुण्याच्या रस्त्यावर दिसणारे ‘ते’ नेमके कोण?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 04, 2021 | 4:30 PM

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रस्त्यांवर काही तरुण फेमस वेब सिरीज 'मनी हाईस्ट' च्या (Money Heist 5) गेटअपमध्ये नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करताना दिसतायेत. हे पथनाट्य आहे का? हे तरुण कोण आहेत? ही कुठली सामाजिक संस्था आहे का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

‘Bella Ciao’चा ताल अन् डालीच्या वेशात कोरोना लस घेण्याचं आवाहन, पुण्याच्या रस्त्यावर दिसणारे ‘ते’ नेमके कोण?
खास रे ग्रुप

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रस्त्यांवर काही तरुण फेमस वेब सिरीज ‘मनी हाईस्ट’ च्या (Money Heist 5) गेटअपमध्ये नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करताना दिसतायेत. हे पथनाट्य आहे का? हे तरुण कोण आहेत? ही कुठली सामाजिक संस्था आहे का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. यांचे व्हिडीओजही गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हे युवक कोण आहे यावरून आता पडदा उठला असून, ही आहे टीम ‘खास रे’!

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असलेला लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर गजबजलेल्या पुण्यातील रस्त्यांवर अचानक काही युवकांनी येऊन फिल्मी स्टाईलने लस घेण्याचं आवाहन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आधी हे नेमकं काय चाललंय, अशा आर्विभावात असलेल्या पुणेकरांनी नंतर मात्र हा माहौल एन्जॉय केला. नागरिक अजून ही गाफील आहेत. नियमांचे काटेकोर पालन करत नाहीयेत. तसेच लसीबद्दल ही वेगवेगळे संभ्रम पसरविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे मनोरंजनात्मक पध्दतीने जनजागृती करण्यासाठी हे गाणं केल्याचं टीम ‘खास रे’ आणि निर्माते नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by डिप्लोमा चा कट्टा (@diploma_cha_katta_)

नेहमीच डिजीटल प्लॅटफॉर्मवर आपलं वेगळेपण जपणाऱ्या खास रे टीम ने यावेळी वेगळी थीम वापरून लस घेण्याचं आवाहन केलं आहे. गाण्याची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन  संजय श्रीधरचं असून संदेश कालेकरनं संगीत बद्ध केलेल़ं हे गाणं निरंजन पेडगावकरनं गायलं आहे.

‘लस घ्या, लस घ्या’ हे गाणं लवकरच ‘खास रे’ च्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून गाण्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे..

‘मनी हाईस्ट 5’ची भुरळ मुंबई पोलिसांनाही!

मनी हाईस्टच्या पाचव्या सीझनचा (Money Heist 5) पहिला खंड अखेर रिलीज झाला आहे. चाहते या सीझनची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) देखील या शोचा ट्रेंड एका वेगळ्याच प्रकारे फॉलो केला आहे. वास्तविक, मुंबई पोलिसांच्या बँडने या सीरीजच्या ‘बेला चाओ’ (Bella Ciao) या गाण्याचे इन्स्ट्रुमेंट व्हर्जन रिलीज केले आहे, जे सोशल मीडियावर हिट झाले आहे. मुंबई पोलिसांचा हा बँड ‘खाकी स्टुडिओ’ नावाने ओळखला जातो. मुंबई पोलिसांनी बँडचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात सर्वजण वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट व्हर्जन वाजवत आहेत.

नेहमीप्रमाणे ट्रेंडला अनुसरून, मुंबई पोलिसांनी पुन्हा काहीतरी मजेदार सदर केले आणि मनी हाईस्टच्या ‘बेला चाओ’ या गाण्याचे इन्स्ट्रुमेंट व्हर्जन वाजवले. व्हिडीओ शेअर करताना मुंबई पोलिसांनी लिहिले, ‘नेहमी काहीतरी नवीन करण्याचा ट्रेंड करण्याचा प्रयत्न करा. सुरक्षेचा सीझन कधीही संपू देऊ नका. ‘बेला चाओ’सह खाकी स्टुडिओ पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

हेही वाचा :

छोट्या पडद्यावरची ‘संस्कारी बहु’ श्वेता तिवारीच्या ग्लॅमरस अंदाजाने जिंकलं चाहत्यांचं हृदय, पाहा फोटो…

ऋषी कपूर यांच्या ‘शर्माजी नमकीन’चा फर्स्ट लूक प्रदर्शित, लाडक्या अभिनेत्याला पाहून चाहते झाले भावूक!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI