AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIRAL : आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं, सतत त्रास देणाऱ्या गव्याला हत्तीने सोंडेने उचलून आपटलं

Wild life | एरवी वाघ किंवा सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. मात्र, हत्तीसारखा शांत प्राणी चवताळून उठतो तेव्हा काय होतं, हे दाखवणारी छायाचित्रं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIRAL : आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं, सतत त्रास देणाऱ्या गव्याला हत्तीने सोंडेने उचलून आपटलं
गव्याला हत्तीने सोंडेने उचलून आपटलं
| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 12:30 PM
Share

मुंबई: सोशल मीडियावर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या व्हीडिओंमध्ये प्राण्यांचे व्हीडिओ हे टॉप लिस्टमध्ये असतात. यापैकी जंगलातील शिकारीचे व्हीडिओ तर अंगावर रोमांच उभे करणारे असतात. एरवी वाघ किंवा सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. मात्र, हत्तीसारखा शांत प्राणी चवताळून उठतो तेव्हा काय होतं, हे दाखवणारी छायाचित्रं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Elephant and wild buffalo fight photos goes viral on social Media)

फोटोत नेमकं काय आहे?

हा फोटो केनियाच्या मसाई मारा अभयारण्यातील असल्याचे समजते. काही पर्यटक याठिकाणी फिरत होते. त्यावेळी एक गवा हत्तीणीच्या पिल्लाला सतत त्रास देत होता. बराचवेळ हा प्रकार सुरु होता. मात्र, सरतेशेवटी हत्तीने गव्याला सोंडेने सहजपणे उचलून खाली आपटलं. जंगलातील गव्याचे सर्वसाधारण वजन 500 किलो इतके असते. त्यामुळे हत्तीने आपल्या सोंडेत गव्याला उचलले यावरुन आपल्याला हत्तीच्या ताकदीची कल्पना येऊ शकते. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गुजरातमध्ये भररस्त्यात सिंहांचा गाईवर हल्ला

सोशल मीडियावर सध्या गुजरातमधील एका घटनेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ गुजरातच्या जुनागढ परिसरातील आहे. यामध्ये रात्रीच्यावेळी भररस्त्यात दोन सिंहांनी एका गाईवर हल्ला चढवलेला दिसत आहे. आतापर्यंत आपण गुजरातमध्ये रस्त्यावर आणि रहिवासी परिसरात सिंहांचे कळप फिरण्याचे अनेक व्हीडिओ पाहिले असतील. मात्र, हा व्हीडिओ अंगावर अक्षरश: काटा आणणार आहे. यामध्ये सिंहांनी गायीला पकडले आहे. रस्त्यावर अनेक वाहनं असूनही सिंहांना त्याची फिकीर नसल्याचे दिसते. काही वाहनचालक गाईला वाचवण्यासाठी आपल्या गाडीचे हॉर्न जोरजोरात वाजवताना दिसत आहेत. मात्र, सिंहांवर त्याचा परिणाम होताना दिसत नाही. गाईला वाचवायची इच्छा असूनही कोणीही गाडीतून बाहेर पडण्याची हिंमत करत नाही.

संबंधित बातम्या:

VIDEO | साडा कुत्ता कुत्ता, तौडा कुत्ता टॉमी, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परीचा चिमुरड्यासोबत भन्नाट व्हिडीओ

Video | सुस्साट वेगात दुचाकी चावलण्याचा प्रयत्न, पण मध्येच विचित्र अपघात, तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

VIDEO | कार चालकाचा मृत्यूला वळसा, अपघातातून कसा वाचला जीव, व्हिडीओ पाहा

तात्या विंचूसारखा बसच्या मागच्या शिडीला लोंबकळून प्रवास, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

(Elephant and wild buffalo fight photos goes viral on social Media)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.