तात्या विंचूसारखा बसच्या मागच्या शिडीला लोंबकळून प्रवास, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

जर तुमचा वेळ जात नसेल आणि तुम्हाला खूप कंटाळा येत असेल तर एकदा सोशल मीडिया उघडा. तुमच्याकडे असे मनोरंजन असेल की, तुम्हाला स्वतःला कळणार नाही की बसल्या बसल्या किती वेळ गेला.

तात्या विंचूसारखा बसच्या मागच्या शिडीला लोंबकळून प्रवास, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

मुंबई : जर तुमचा वेळ जात नसेल आणि तुम्हाला खूप कंटाळा येत असेल तर एकदा सोशल मीडिया उघडा. तुमच्याकडे असे मनोरंजन असेल की, तुम्हाला स्वतःला कळणार नाही की बसल्या बसल्या किती वेळ गेला. आम्ही असे म्हणत आहोत कारण, फेसबुक असो की इन्स्टाग्राम किंवा अगदी युट्युब, कुठेही मजेदार व्हिडीओंची कमतरता नाही. असाच एक मजेशीर व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका मजेदार आहे की, तो पाहून हसणं थांबवणं अशक्य आहे. (Funny video of people hanging in roadways bus)

या व्हिडिओमध्ये, रोडवेज बस दिसत आहे, या बसच्या छतापासून मागच्या बाजूपर्यंत असा कोणताही भाग नाही, जिथे लोक चिकटलेले दिसत नाहीत. बसच्या छतावर अनेक प्रवासी दिसत आहेतच, सोबत मागच्या बाजूलादेखील काही प्रवासी लोंबकळत प्रवास करत आहेत. हे लोक आपल्या जीवाची पर्वा न करता बसच्या छतावर बसले आहेत. तसेच ज्यांना छतावर बसण्यासाठी जागा मिळाली नाही, ते बसच्या मागे असलेल्या शिडीचा (छतावर जाण्यासाठी असलेल्या शिडीवर) आधार घेऊन लोंबकळत प्रवास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by chaklo_rakhlo (@chaklo_rakhlo_006)

व्हिडिओबद्दल सांगायचे झाल्यास हा व्हिडीओ पंजाबचा असल्याचे दिसते. कारण बसच्या मागच्या बाजूला पीआरटीसी लिहिलेले दिसते. व्हिडीओ इन्स्टाग्रामवर chaklo_rakhlo_006 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला एक लाख 80 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या अकाऊंटवर तुम्हाला असे अनेक मजेदार व्हिडिओ पाहायला मिळतील. यासोबतच अनेक रस्ते अपघातांचे व्हिडिओही शेअर करण्यात आले आहेत.

इतर बातम्या

VIDEO | साडा कुत्ता कुत्ता, तौडा कुत्ता टॉमी, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परीचा चिमुरड्यासोबत भन्नाट व्हिडीओ

चिमुकल्याच्या डोक्यात कुकर अडकला, अनेक तासांची मेहनत, शेवटी मशीनने कुकर कापला!

VIDEO | रंगीत कपड्यांमध्ये मधमाशीसारखा दिसतोय हा कुत्रा, हा गोंडस व्हिडीओ पाहून तुमचाही दिवस बनेल

(Funny video of people hanging in roadways bus)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI