VIDEO : आज हम लोग मस्ती करेगाssss, दहीहंडीतील गंमती जमती, तुफान हसवणारा व्हिडीओ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: prajwal dhage

Updated on: Aug 31, 2021 | 5:48 PM

सोशल मीडियावर दहीहंडीचे अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दहीहंडीतील गंमती जमती या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हंडी फोडण्यासाठी मनोरे रचताना किती कसरत करावी लागते हे या व्हिडीओतून दिसत आहे.

VIDEO : आज हम लोग मस्ती करेगाssss, दहीहंडीतील गंमती जमती, तुफान हसवणारा व्हिडीओ
Dahi Handi Krishna Janmashtami

मुंबई : गोकुळ अष्टमीनिमित्त (Krishna Janmashtami) मुंबईसह देशभरात गोपाल काल्याचा उत्साह असतो. मुंबईतील दहीहंडी तर देश-विदेशात प्रसिद्ध आहे. मात्र कोरोना संकटामुळे दोन वर्षांपासून मुंबईसह महाराष्ट्रात थरावर थर रचले जात नाहीत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केंद्राच्या निर्देशाप्रमाणे राज्य सरकारने दहीहंडी उत्सव (Dahi Handi) साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. असं असलं तरी विरोधी पक्षांनी दहीहंडीचे मनोरे रचून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला. (people celebrating Krishna Janmashtami 2021 across india see funny viral video of Dahi Handi)

दहीहंडीचे मजेदार व्हिडीओ तुफान व्हायरल  

एकीकडे हे चित्र असताना, दुसरीकडे सोशल मीडियावर दहीहंडीचे अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दहीहंडीतील गंमती जमती या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हंडी फोडण्यासाठी मनोरे रचताना किती कसरत करावी लागते हे या व्हिडीओतून दिसत आहे.

हंडी फोडण्याचा मुलांचा प्रयत्न 

एका व्हिडीओत चार मुलं हंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी जी हंडी उभारली आहे ती खूपच मजेशीर आहे. एक मुलगा गॅलरीत उभा आहे. त्याच्या हातात हंडी आहे. खाली दोन मुलं आहेत. एकाने दुसऱ्याला खांद्यावर घेतलं आहे आणि ते गॅलरीत उभा असलेल्या मुलाच्या हातातील हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. मात्र गॅलरीत उभा असलेल्या मुलाच्या पायाखालची फळी निसटते आणि त्याचे पाय आहे तसे खाली सटकतात.

पाहा मजेदार व्हिडीओ :

व्हिडीओत पाहताना तुम्हाला हसू आवरणार नाही

दुसऱ्या व्हिडीओत एका महिलेला वर उचलेलं दिसतं. साडी नेसलेली मध्यम वयाची महिला मोठ्या कसोशीने मनोऱ्यावर चढते. ती हंडी फोडण्याचा प्रयत्न करते. पण तिला हंडी फुटत नाही. शेवटी ती कशाप्रकारे हंडी फोडते ते या व्हिडीओत पाहताना तुम्हाला हसू आवरणार नाही.

इतर बातम्या :

Video | भर रस्त्यात राग अनावर, म्हाताऱ्या आजोबांचा तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

VIDEO: व्हेरी फनी! सहा व्हिलन एकत्र, घाबरलेल्या स्पायडरमॅनकडून देवाचा जप

VIDEO: अमेरिकन डान्सर पत्नीसोबत बॉलीवूडच्या ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर थिरकतो तेव्हा….

(people celebrating Krishna Janmashtami 2021 across india see funny viral video of Dahi Handi)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI