VIDEO: अमेरिकन डान्सर पत्नीसोबत बॉलीवूडच्या ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर थिरकतो तेव्हा….

या व्हीडिओत रिकी पाँड आपल्या पत्नीसोबत बॉलीवूडच्या 'रा वन' चित्रपटातील 'छम्मक छल्लो' या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रिकी पाँड यांनी सदरा-लेंगा आणि वर नेहरू जॅकेट असा पेहराव केला आहे. तर त्यांच्या पत्नीनेही निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दोघेही पती-पत्नी 'छम्मक छल्लो' या गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसत आहे.

VIDEO: अमेरिकन डान्सर पत्नीसोबत बॉलीवूडच्या 'छम्मक छल्लो' गाण्यावर थिरकतो तेव्हा....
रिकी पाँड

मुंबई: अमेरिकेतील रिकी पाँड हे सोशल मीडियावर डान्सिंग डॅड म्हणून ओळखले जातात. ते अनेकदा बॉलीवूड चित्रपटांतील गाण्यांवरही डान्स करतात. त्यांचा एक नवा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ भारतीय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. (Ricky Pond and his wife dance on bollywood song goes Viral on Social Media)

व्हीडिओत नेमकं काय आहे?

या व्हीडिओत रिकी पाँड आपल्या पत्नीसोबत बॉलीवूडच्या ‘रा वन’ चित्रपटातील ‘छम्मक छल्लो’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रिकी पाँड यांनी सदरा-लेंगा आणि वर नेहरू जॅकेट असा पेहराव केला आहे. तर त्यांच्या पत्नीनेही निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दोघेही पती-पत्नी ‘छम्मक छल्लो’ या गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसत आहे.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे.

कोण आहेत रिकी पाँड?

डान्सिंग डॅड अशी बिरुदावली मिळवणाऱ्या रिकी पाँड यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. यामध्ये अनेक भारतीयांचाही समावेश आहे. रिकी पाँड यांच्या प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टवर हजारो लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडतो. काही दिवसांपूर्वी रिकी पाँड यांनी ‘बचपन का प्यार’ या गाण्यावर केलेला डान्सही तुफान व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ricky Pond (@ricky.pond)


संबंधित बातम्या:

Video: सपना चौधरीलाही टक्कर, घर घर की कहानी, हरीयानवी गाणे, देवर-भाभी दिवाने

VIDEO: शाहरुख-दीपिकाला टक्कर, आज्जीबाईंचा लुंगी डान्स, लुंगी डान्स, एकदम स्टेज तोड परफॉर्मन्स

VIDEO: माझे दोन दातं तुटलं, मोबाईल पण गेला, आता आईपण मारेल; हा व्हायरल व्हीडिओ पाहिलात का?

(Ricky Pond and his wife dance on bollywood song goes Viral on Social Media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI