VIDEO: माझे दोन दातं तुटलं, मोबाईल पण गेला, आता आईपण मारेल; हा व्हायरल व्हीडिओ पाहिलात का?

'ए माझे दोन दातं तुटले', 'माझा मोबाईलपण गेला, आता माझी मम्मी करुन टाकते', 'अबे साला मने बहोत लागला बे' हे संभाषण तर पोट धरून हसायला लावणारे आहे. सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

VIDEO: माझे दोन दातं तुटलं, मोबाईल पण गेला, आता आईपण मारेल; हा व्हायरल व्हीडिओ पाहिलात का?
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 11:41 AM

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक भावनिक, मजेशीर किंवा चीड आणणारे व्हीडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही मजेशीर व्हीडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हीडिओ शुटिंगच्या नादात बाईकवरुन पडल्यानंतरचा दोन मुलींमधील संवाद यामध्ये आहे.

या व्हीडिओत सुरुवातीला एका मोबाईल कॅमेऱ्यातून समोरचा रस्ता शूट होताना दिसत आहे. पाठीमागे काही मुलींचा आवाज ऐकू येतो. त्याचवेळी बाईकस्वाराचे नियंत्रण सुटून दुचाकी थेट रस्त्यालगतच्या झुडुपांमध्ये जाऊन कोसळते. या अपघातात सुदैवाने कोणाला फारशी गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, त्यानंतर दोन मुलींमध्ये सुरु असलेला संवाद अतिश्य मजेशीर आहे.

‘ए माझे दोन दातं तुटले’, ‘माझा मोबाईलपण गेला, आता माझी मम्मी करुन टाकते’, ‘अबे साला मने बहोत लागला बे’ हे संभाषण तर पोट धरून हसायला लावणारे आहेत. सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. instant.marathi या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे.

भरधाव वेगात आल्याने अपघात, दुचाकी घुसली थेट घरात

कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरला संपूर्ण भारत ओळखतो. विनोदी बुद्धी आणि हजरजबाबीपणाच्या जोरावर तो सध्या यशाच्या शिखरावर आहे. सुनील ग्रोवर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सध्या त्याने एक अतिशय मजेदार व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. सुनील ग्रोवरने शेअर केलेला हा व्हिडीओ विविध समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ फक्त आठ सेकंदांचा आहे. आठ सेकंदांचा असला तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओमध्ये दोन दुचाकीस्वार थेट घरात शिरले आहेत. दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. सुनिस ग्रोवरने या व्हिडीओला मजेदार कॅप्शन दिलं असून ‘मेरा पिया घर आया’ असं सुनिलने व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय.

मुळात व्हिडीओमध्ये दिसत असलेले दुचाकीस्वार अतिशय वेगात दुचाकी चालवत आहेत. दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना काय करावे समजत नाहीये. शेवटी नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी थेट समोरच्या घरात शिरली आहे. घराला दरवाजा नसल्यामुळे ही दुचाकी थेट घरात शिरलीय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

संबंधित बातम्या:

Video | आधी दिराने मारलं, मग वहिनी भिडली, दोघांची रस्त्यावर जोरदार मारामारी, व्हिडीओ व्हायरल

Video | भरधाव वेगात आल्याने अपघात, दुचाकी घुसली थेट घरात, मजेदार व्हिडीओ व्हायरल

VIDEO: तुझ्या डोशाचा स्टॉलला हिंदू देवाचं नाव का दिलंस, टोळक्याची मुस्लीम तरुणाला मारहाण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.