Video | भरधाव वेगात आल्याने अपघात, दुचाकी घुसली थेट घरात, मजेदार व्हिडीओ व्हायरल

सुनील ग्रोवर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सध्या त्याने एक अतिशय मजेदार व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. सुनील ग्रोवरने शेअर केलेला हा व्हिडीओ विविध समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

Video | भरधाव वेगात आल्याने अपघात, दुचाकी घुसली थेट घरात, मजेदार व्हिडीओ व्हायरल
accident viral video


मुंबई : कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरला संपूर्ण भारत ओळखतो. विनोदी बुद्धी आणि हजरजबाबीपणाच्या जोरावर तो सध्या यशाच्या शिखरावर आहे. सुनील ग्रोवर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सध्या त्याने एक अतिशय मजेदार व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. सुनील ग्रोवरने शेअर केलेला हा व्हिडीओ विविध समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. (sunil grover shared accident funny videos went viral on social media)

‘मेरा पिया घर आया’ असं कॅप्शन

व्हायरल होत असलेला व्हिडीओ फक्त आठ सेकंदांचा आहे. आठ सेकंदांचा असला तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओमध्ये दोन दुचाकीस्वार थेट घरात शिरले आहेत. दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. सुनिस ग्रोवरने या व्हिडीओला मजेदार कॅप्शन दिलं असून ‘मेरा पिया घर आया’ असं सुनिलने व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय.

दुचाकी थेट समोरच्या घरात शिरली

मुळात व्हिडीओमध्ये दिसत असलेले दुचाकीस्वार अतिशय वेगात दुचाकी चालवत आहेत. दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना काय करावे समजत नाहीये. शेवटी नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी थेट समोरच्या घरात शिरली आहे. घराला दरवाजा नसल्यामुळे ही दुचाकी थेट घरात शिरलीय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरले नाही. तर काही लोकांनी दुचाकी हळू आणि जपून चालवायला हवी, असा सल्ला दिला आहे. कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरने हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे त्याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे.

इतर बातम्या :

Video | आधी दिराने मारलं, मग वहिनी भिडली, दोघांची रस्त्यावर जोरदार मारामारी, व्हिडीओ व्हायरल

Video | नवरदेवाने खोड काढल्यानंतर नवरीचा एकच इशारा, पाहा नेमकं काय केलं ?

Video | भर मंडपात तोंडात गुटखा टाकला, नवरीने नवरदेवाला पाहुण्यांसमोर झापलं, व्हिडीओ पाहाच !

(sunil grover shared accident funny videos went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI