Video | नवरदेवाने खोड काढल्यानंतर नवरीचा एकच इशारा, पाहा नेमकं काय केलं ?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 29, 2021 | 3:53 PM

सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. एकमेकांच्या गळात वरमाला टाकताना नव्या जोडीमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे.

Video | नवरदेवाने खोड काढल्यानंतर नवरीचा एकच इशारा, पाहा नेमकं काय केलं ?
BRIDE AND GROOM VIRAL VIDEO

Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ पाहून आपण थक्क होऊन जातो. तर काही व्हिडीओंमध्ये अतिशय मजेदार गोष्टी दाखवल्या जातात. लग्नातील व्हिडीओंमध्ये नवरी आणि नवरदेव यांनी केलेली धम्माल तर पाहण्यासारखी असते. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. एकमेकांच्या गळात वरमाला टाकताना नव्या जोडीमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. (bride gives sign to his groom marriage function video went viral on social media)

नवरदेव नवरीची खोड काढतोय 

आपल्या लग्नाचा दिवस कायम स्मरणात राहावा म्हणून नवरी-नवरदेव वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. असंच वेगळं डोकं व्हिडीओतील नवरदेवाने लावले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवाने नवरीची चांगलीच खोड काढली आहे. एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकताना नवरदेवाने खास पद्धतीने नवरीला नकार दिला आहे.

नवरीचा नवरदेवाला इशारा ?

व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकण्यासाठी उभे राहिले आहेत. काही वेळानंतर नवरीने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकण्यासाठी आपले हात वर केले आहेत. पण त्याच वेळी नवरदेवाने खोडा घातला आहे. त्यानेही आपले हात वर करत नवरीला त्याच्या गळ्यात वरमाला टाकण्यापासून अडवले आहे. नवरदेव माझी खोड काढतोय असे समजल्यावर नवरीने त्याला एक इशारा केलाय. तू हात खाली कर. आधी मी वरमाला टाकणार. नंतर तू माझ्या गळ्यात वरमाला टाक, असं ती नवरदेवाला इशाऱ्याने सांगतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मात्र, एवढं सारं करुनही नवरदेव नवरीचे ऐकत नाहीये. नवरी गळ्यात वरमाला टाकताना नवरदेव पुन्हा पुन्हा आपले हात वर करत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर Official Niranjanm87 अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video : स्टेजवर दोन मुलींची अशी झाली नाचक्की, हा व्हिडीओ पाहून मुली म्हणणारच नाहीत, ‘डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो’

Viral: ‘हा’ डान्सचा व्हीडिओ पाहिलात का, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

वय 63 वर्षे पण अजूनही तरुणच, आजीबाईंचा बहारदार डान्स एकदा पाहाच !

(bride gives sign to his groom marriage function video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI