AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : स्टेजवर दोन मुलींची अशी झाली नाचक्की, हा व्हिडीओ पाहून मुली म्हणणारच नाहीत, ‘डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो’

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ भावनिक असतात, ते पाहून डोळ्यात अश्रू येतात, तर काही व्हिडीओ इतके मजेदार असतात की दर्शकांना त्यांच्या हास्यावर नियंत्रण ठेवता येत नाही.

Video : स्टेजवर दोन मुलींची अशी झाली नाचक्की, हा व्हिडीओ पाहून मुली म्हणणारच नाहीत, 'डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो'
डान्स व्हि़डीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 10:52 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ भावनिक असतात, ते पाहून डोळ्यात अश्रू येतात, तर काही व्हिडीओ इतके मजेदार असतात की दर्शकांना त्यांच्या हास्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. बऱ्याच वेळा असे व्हिडिओ इंटरनेटवरही बघितले जातात, जे पाहून तुम्हाला आश्चर्य देखील वाटते. (Dance video of two girls goes viral on social media)

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्ही पोट धरून हसाल. या व्हिडिओमध्ये स्टेजवर दोन मुलींची चांगलीच नाचक्की झालेली दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ बघितल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की, डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो…

View this post on Instagram

A post shared by RVCJ Media (@rvcjinsta)

‘डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो’, प्रसिद्ध भारतीय रॅपर बादशाहचे हे गाणे प्रत्येकाच्या तोंडामध्ये कायम असते. पण या डीजे वाले बाबूने दोन मुलींना काय केले हे पाहून, कोणतीही मुलगी डीजे वाले बाबूला तिचे आवडते गाणे डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो’ असे म्हणणार नाही. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये, दोन मुली स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत, पण त्यांनी डान्स करण्यास सुरुवात करताच डीजेने गाणे बदलले.

हा मजेदार व्हिडिओ rvcjinsta नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. लोक फक्त हा व्हिडीओ शेअर करत नाहीतर व्हिडीओला लाईक देखील करत आहेत. मात्र, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

Viral: ‘हा’ डान्सचा व्हीडिओ पाहिलात का, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

VIDEO: तालिबान्यांपासून सुटकेसाठी उभे, अचानक स्फोट आणि मृतदेहांचा खच, ओढ्यातील रक्ताच्या पाण्यानं हादरवलं

वय 63 वर्षे पण अजूनही तरुणच, आजीबाईंचा बहारदार डान्स एकदा पाहाच !

(Dance video of two girls goes viral on social media)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.