मुंबई: सध्या सोशल मीडियावर ‘स्पायडरमॅन नो वे होम’ (SPIDER-MAN: NO WAY HOME) या हॉलीवूडपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर दररोज अगणित मिम्स व्हायरल होत आहेत. SPIDER-MAN: NO WAY HOME या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. कारण, यामध्ये स्पायडरमॅन सिरीजच्या आतापर्यंतच्या सर्व भागांमधील व्हिलन्स एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटात स्पायडरमॅनची भूमिका साकारणारे टोबी मॅग्वायर, अँड्य्रू गारफिल्ड आणि टॉम हॉलंड हे तिन्ही नायकही एकत्र दिसणार आहेत. (Little Spiderman video goes viral on Social Media)