VIDEO | साडा कुत्ता कुत्ता, तौडा कुत्ता टॉमी, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परीचा चिमुरड्यासोबत भन्नाट व्हिडीओ

'साडा कुत्ता कुत्ता, तौडा कुत्ता टॉमी' या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या डायलॉगचं मॅशअप 'माझी तुझी रेशीमगाठी'फेम बालकलाकार मायरा वायकुळने केलं आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत एक चिमुरडाही दिसत आहे.

VIDEO | साडा कुत्ता कुत्ता, तौडा कुत्ता टॉमी, 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीचा चिमुरड्यासोबत भन्नाट व्हिडीओ
माझी तुझी रेशीमगाठ फेम परी अर्थात मायरा वायकुळ

मुंबई : झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) ही नवी मालिका नुकतीच सुरु झाली आहे. पहिल्या आठवड्यातच ‘परी’ची भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वायकुळ (Myra Vaikul) लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मायराने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. ‘साडा कुत्ता कुत्ता, तौडा कुत्ता टॉमी’ या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या डायलॉगचं मॅशअप मायराने केलं आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत एक चिमुरडाही दिसत आहे.

‘साडा कुत्ता कुत्ता, तौडा कुत्ता टॉमी’ काय आहे?

बिग बॉस 13 (Bigg Boss 13) ची स्पर्धक शेहनाज गिल (Shehnaaz Gill) हिने बिग बॉसच्या घरात ‘साडा कुत्ता कुत्ता, तौडा कुत्ता टॉमी’ असा एक डायलॉग मारला होता. त्यानंतर म्युझिक क्रिएटर यशराज मुखाते (Yashraj Mukhate) याने या व्हिडीओचं मॅशअप केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे. अनेक जणांनी यावर डबिंग करत आपापले व्हिडीओ शेअर केले आहेत. मायराच्या क्यूट व्हिडीओने यात आणखी एकाची भर पडली आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaikul (@_world_of_myra_official)

कोण आहे मायरा वायकुळ?

झी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या नवीन मालिकेच्या प्रोमोमध्ये जेमतेम चार वर्षांची एक चिमुरडी अभिनेता श्रेयस तळपदेच्या व्यक्तिरेखेसोबत लग्नाची बोलणी करताना दिसली होती. काय म्हणणं आहे? कमवतो किती? नोकरी कुठे करतो? असे प्रश्न ही चिमुरडी विचारते. त्यावर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा हा हिरो तिच्या वयाला समाधानकारक उत्तरं देतो. त्यानंतर विचार करुन सांगते, असं निरागस उत्तर देते.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या या चिमुरडीचं नाव आहे मायरा वायकुळ. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या दोन बड्या कलाकारांच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाच्या चर्चेपेक्षाही क्युट मायरा भाव खाऊन जात आहे.

सोशल मीडियावर तुफान फॉलोअर्स 

मायरा वायकुळने टिकटॉक व्हिडीओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिकटॉक स्टार म्हणून तिची ओळख होती. सध्या इन्स्टाग्रामवरही तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. सध्या तिचे 75 हजारांपेक्षा जास्त (75.3k) चाहते आहेत.

युट्यूबवर Myra’s corner हे मायराचे चॅनल आहे. त्यावर तिचे आतापर्यंत 105K म्हणजे एक लाख पाच हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. या चॅनलवर मायराचे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. मायराच्या योगा सेशन, खेळण्यांपासून तिने बनवलेला केक आणि हळदी कुंकू समारंभापर्यंत अनेक व्हिडीओ दिसतात.

मायरा वायकुळ आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. तिची आई तिचे सोशल मीडिया अकाऊण्ट सांभाळते. फक्त मायराच नाही, तर तिची आई श्वेता वायकुळचेही हजारो फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहेत.

संबंधित बातम्या :

Myra Vaikul | श्रेयस तळपदेला ‘कमवतो किती?’ विचारणाऱ्या मायराची फॉलोअर्सची कमाई किती?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI