VIDEO: गुजरातमध्ये भररस्त्यात सिंहांचा गाईवर हल्ला, नागरिक गाडीचे हॉर्न वाजवत राहिले पण शिकार केलीच

Lion | हा व्हीडिओ गुजरातच्या जुनागढ परिसरातील आहे. यामध्ये रात्रीच्यावेळी भररस्त्यात दोन सिंहांनी एका गाईवर हल्ला चढवलेला दिसत आहे. आतापर्यंत आपण गुजरातमध्ये रस्त्यावर आणि रहिवासी परिसरात सिंहांचे कळप फिरण्याचे अनेक व्हीडिओ पाहिले असतील.

VIDEO: गुजरातमध्ये भररस्त्यात सिंहांचा गाईवर हल्ला, नागरिक गाडीचे हॉर्न वाजवत राहिले पण शिकार केलीच
शिकार
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 10:31 AM

अहमदाबाद: सोशल मीडियावर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या व्हीडिओंमध्ये प्राण्यांचे व्हीडिओ हे टॉप लिस्टमध्ये असतात. यापैकी जंगलातील शिकारीचे व्हीडिओ तर अंगावर रोमांच उभे करणारे असतात. मात्र, असाच एक प्रकार जंगलात नव्हे तर गुजरातमध्ये भररस्त्यात घडला आहे. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Lion hunt down cow video goes viral on social Media)

व्हीडिओत नेमकं काय?

हा व्हीडिओ गुजरातच्या जुनागढ परिसरातील आहे. यामध्ये रात्रीच्यावेळी भररस्त्यात दोन सिंहांनी एका गाईवर हल्ला चढवलेला दिसत आहे. आतापर्यंत आपण गुजरातमध्ये रस्त्यावर आणि रहिवासी परिसरात सिंहांचे कळप फिरण्याचे अनेक व्हीडिओ पाहिले असतील. मात्र, हा व्हीडिओ अंगावर अक्षरश: काटा आणणार आहे.

यामध्ये सिंहांनी गायीला पकडले आहे. रस्त्यावर अनेक वाहनं असूनही सिंहांना त्याची फिकीर नसल्याचे दिसते. काही वाहनचालक गाईला वाचवण्यासाठी आपल्या गाडीचे हॉर्न जोरजोरात वाजवताना दिसत आहेत. मात्र, सिंहांवर त्याचा परिणाम होताना दिसत नाही. गाईला वाचवायची इच्छा असूनही कोणीही गाडीतून बाहेर पडण्याची हिंमत करत नाही.

व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. Zubin Ashara या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो जणांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

मुलाने समुद्रात सूर मारला अन् तितक्यात बोट आली, पण….

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एक लहान मुलगा अपघातामधून थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे. या व्हीडिओच्या सुरुवातीला दोन लहान मुले समुद्रावर उभारलेल्या पुलावर उभी असलेली दिसत आहेत. ही दोन्ही मुलं समुद्रात सूर मारायच्या बेतात आहेत. यापैकी एक मुलगा समुद्रात उडी मारतो. त्यापाठोपाठ दुसरा लहान मुलगाही समुद्रात सूर मारतो. अवघ्या काही सेकंदातच हा मुलगा किती मोठ्या अपघातामधून बचावला, हे आपल्या लक्षात येते. कारण या लहान मुलाने समुद्रात सूर मारल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये तिथून एक लहान बोट जाताना दिसते. या लहान मुलाने उडी मारायला आणखी उशीर केला असता तर बोटीवर आपटून त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती. मात्र, केवळ दैव बलवत्तर म्हणून हा मुलगा थोडक्यात अपघातामधून बचावला.

संबंधित बातम्या:

VIDEO | साडा कुत्ता कुत्ता, तौडा कुत्ता टॉमी, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परीचा चिमुरड्यासोबत भन्नाट व्हिडीओ

Video | सुस्साट वेगात दुचाकी चावलण्याचा प्रयत्न, पण मध्येच विचित्र अपघात, तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

VIDEO | कार चालकाचा मृत्यूला वळसा, अपघातातून कसा वाचला जीव, व्हिडीओ पाहा

तात्या विंचूसारखा बसच्या मागच्या शिडीला लोंबकळून प्रवास, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

(Lion hunt down cow video goes viral on social Media)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.