VIDEO: मुलाने समुद्रात सूर मारला अन् तितक्यात बोट आली, पण….

Viral Video | या व्हीडिओच्या सुरुवातीला दोन लहान मुले पुलावर उभी असलेली दिसत आहेत. ही दोन्ही मुलं समुद्रात सूर मारायच्या बेतात आहेत. यापैकी एक मुलगा समुद्रात उडी मारतो. त्यापाठोपाठ दुसरा लहान मुलगाही समुद्रात सूर मारतो.

VIDEO: मुलाने समुद्रात सूर मारला अन् तितक्यात बोट आली, पण....

मुंबई: सोशल मीडियावर अनेक थरारक घटना आणि अपघातांचे व्हीडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हीडिओ बघून एखादा माणूस किती सुदैवी असू शकतो, याचा प्रत्यय येतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एक लहान मुलगा अपघातामधून थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे.

नेमकं काय आहे व्हीडिओत?

या व्हीडिओच्या सुरुवातीला दोन लहान मुले समुद्रावर उभारलेल्या पुलावर उभी असलेली दिसत आहेत. ही दोन्ही मुलं समुद्रात सूर मारायच्या बेतात आहेत. यापैकी एक मुलगा समुद्रात उडी मारतो. त्यापाठोपाठ दुसरा लहान मुलगाही समुद्रात सूर मारतो. अवघ्या काही सेकंदातच हा मुलगा किती मोठ्या अपघातामधून बचावला, हे आपल्या लक्षात येते. कारण या लहान मुलाने समुद्रात सूर मारल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये तिथून एक लहान बोट जाताना दिसते. या लहान मुलाने उडी मारायला आणखी उशीर केला असता तर बोटीवर आपटून त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती. मात्र, केवळ दैव बलवत्तर म्हणून हा मुलगा थोडक्यात अपघातामधून बचावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meemlogy (@meemlogy)

व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. meemlogy या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 10 लाख लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे. यावर अनेक मजेशीर आणि सुटकेचा निश्वास टाकणाऱ्या कमेंट पाहायला मिळत आहेत.

पुलावरुन जाताना गाडी अचानक वळली अन् थेट नदीत कोसळली

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका कारचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक पांढऱ्या रंगाची कार वळण घेऊन नदीच्या पूलावर जाताना दिसत आहे. ही गाडी व्यवस्थित वळण घेऊन पुलावर येते. मात्र, त्याचवेळी चालकाने स्टेअरिंग जास्तच फिरवल्यामुळे ही सफेद कार जास्तच वळते आणि पुलावरून थेट खाली कोसळते. हा विचित्र अपघात पाहून आजुबाजूच्या लोकांना थोडावेळ काय झाले हेच समजत नाही. सुदैवाने पुलाची उंची कमी असल्याने गाडी नदीत तितक्याशा वेगाने कोसळत नाही. तसेच नदीतही पाणी कमी असल्याने गाडी बुडाली नव्हती.

संबंधित बातम्या:

VIDEO | साडा कुत्ता कुत्ता, तौडा कुत्ता टॉमी, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परीचा चिमुरड्यासोबत भन्नाट व्हिडीओ

Video | सुस्साट वेगात दुचाकी चावलण्याचा प्रयत्न, पण मध्येच विचित्र अपघात, तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

VIDEO | कार चालकाचा मृत्यूला वळसा, अपघातातून कसा वाचला जीव, व्हिडीओ पाहा

तात्या विंचूसारखा बसच्या मागच्या शिडीला लोंबकळून प्रवास, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI