VIDEO | कार चालकाचा मृत्यूला वळसा, अपघातातून कसा वाचला जीव, व्हिडीओ पाहा

रस्त्यावर कारमध्ये आरामात बसून फिरायला कोणाला आवडत नाही? पण, काही लोक गाडी चालवताना ना स्वत:चा विचार करत ना इतरांचा. त्यामुळे रस्त्यावर धोकादायक अपघात होतात आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या अशाच एका ट्रक ड्रायव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

VIDEO | कार चालकाचा मृत्यूला वळसा, अपघातातून कसा वाचला जीव, व्हिडीओ पाहा
Viral Video Of Car

मुंबई : रस्त्यावर कारमध्ये आरामात बसून फिरायला कोणाला आवडत नाही? पण, काही लोक गाडी चालवताना ना स्वत:चा विचार करत ना इतरांचा. त्यामुळे रस्त्यावर धोकादायक अपघात होतात आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या अशाच एका ट्रक ड्रायव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण सुदैवाने, कार चालकाने प्रसंगावधान साधत वेळीच गाडी बाजुला केल्याने त्याचा जीव वाचला आहे.

आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की वाहने महामार्गावर वेगात धावत आहेत, परंतु या दरम्यान काही वाहने काही कारणास्तव उड्डाणपुलाच्या आधी थांबतात. त्यानंतर एक ट्रक मागून खूप वेगाने येतो. पण, सुदैवाने रस्त्यात थांबलेल्या एका कार चालकाने वेळेत वाहन बाजूला घेतले.

पाहा व्हिडिओ –

हा व्हिडीओ अतिशय धक्कादायक आहे. जर या वेळी कार चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर एक मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. ज्यामध्ये अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला हे वाटेल मृत्यू या कारमधील लोकांच्या किती जवळ येऊन निघून गेला.

हा व्हिडिओ पाहून काही लोक इतके भडकले की त्यांनी ड्रायव्हरला दोष देणे सुरु केले. एका वापरकर्त्याने रागात लिहीले की अशा मूर्ख लोकांमुळे अनेक कुटुंबांवर दु: खाचा डोंगर कोसळतो. त्याचवेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने असे म्हटले की, अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे.

जरी अनेक लोक आभार मानत आहेत की कारमधील व्यक्तीचे प्राण वाचले. तथापि, काही लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर असे म्हणत आहेत की ट्रक चालक आणि कार चालक दोघांनीही समज दाखवली, ज्यामुळे हा मोठा अपघात टळला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. यासह, लोक हे देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की रस्त्यावर नेहमी सतर्क रहावे.

संबंधित बातम्या :

VIDEO | रंगीत कपड्यांमध्ये मधमाशीसारखा दिसतोय हा कुत्रा, हा गोंडस व्हिडीओ पाहून तुमचाही दिवस बनेल

Video | सुस्साट वेगात दुचाकी चावलण्याचा प्रयत्न, पण मध्येच विचित्र अपघात, तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

Video | टोयोटा फॉर्च्यूनरमध्ये बसून समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी, पण मध्येच लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI