Gori Nagori Dance Video : राजस्थानच्या गौरी नागौरीचा धडाकेबाज डान्स, चाहत्यांची गर्दी, व्हिडीओ व्हायरल

सध्या गौरीचा एक डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे

Gori Nagori Dance Video : राजस्थानच्या गौरी नागौरीचा धडाकेबाज डान्स, चाहत्यांची गर्दी, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Nov 17, 2022 | 12:14 PM

Gori Nagori Dance Video Viral :  सध्या हरियाणा आणि राजस्थानमध्ये गौरी नागौरीचा (Gori Nagori ) जलवा पाहण्यासारखा आहे. गौरी तिच्या धडाकेबाज डान्समुळे खूप चर्चेत आहे. गौरीच्या डान्सचे चाहते हे हरियाणा आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. काही वेळा गौरीच्या डान्समधील स्टेप्स ह्या वादाच्या भोवऱ्यात देखील सापडल्या आहेत. तरी सुद्ध गौरी ही आपल्या डान्सवर होणाऱ्या टीकेला बाजूला ठेवून ती आपली कला ही सादर करत आहे. सध्या गौरीचा एक डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर ( Dance Video Viral) धुमाकूळ घालत आहे. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. तिचा हा डान्सचा व्हिडीओ सपना चौधरीला (Sapna Choudhary) टक्कर देणारा आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी असते.

बिग बॉस फेम गौरी नागौरी

राजस्थानची गौरी नागौरी ही बिग बॉस 16 ची स्पर्धक आहे. तिने बिग बॉसच्या (Bigg Boss) शोमध्ये धुमाकूळ घातला आहे. गौरी नागौरी ज्या पद्धतीने बिग बॉसमध्ये खेळत आहे ते पाहून बिग बॉसचे होस्ट आणि सुपरस्टार सलमान खानही खूश आहे.

सलमान खानने देखील गौरी नागौरीचं कौतुक केलं आहे. गौरी नागौरी ही बिग बॉस शो आणि त्यामधील गेमची मास्टरमाईंड आहे. सलमान खानने गौरी नागौरीचे केलेलं कौतुक पाहून बिग बॉसमधील स्पर्धकांना एक मोठा धक्का बसला आहे.