लग्न होत राहील, आधी रील बनवून घे!; लग्नातील व्हीडिओमुळे बिहारचा लखपती युट्यूबर ट्रोल

Bihar Raja Vlogs Troll on His Wedding Viral Video on Instgram : लग्नातील विधीदरम्यान रील बनवणाऱ्या युट्यूबरचा व्हीडिओ पाहिलात का?; 2 कोटी 80 लाख लोकांनी पाहिलेल्या व्हीडिओत नेमकं काय? का होतोय हा व्हीडिओ व्हायरल? व्हीडिओतील जोडपं नेमकं कोण? वाचा सविस्तर...

लग्न होत राहील, आधी रील बनवून घे!; लग्नातील व्हीडिओमुळे बिहारचा लखपती युट्यूबर ट्रोल
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 1:05 PM

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : सध्या लग्न म्हटलं की डेस्टिनेशन वेडिंग डोळ्यासमोर उभं राहातं. या लग्नांसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. अमाप खर्च करून केलेल्या लग्नातील फोटो आणि व्हीडिओंची जोरदार चर्चा होते. पण सध्या एका व्हीडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हा व्हीडिओ आहे बिहारमधील एका युट्यूबरचा… लग्नातील विधी दरम्यान शूट केलेलं एक रील सध्या प्रचंड चर्चेत आहे. नवरी मुलीच्या भांगात सिंदूर लावताना ही व्हीडिओ बनवण्यात आलाय. या व्हीडिओला करोडो लोकांनी पाहिलं आहे. 2 कोटी 80 लाख लोकांनी पाहिलेल्या व्हीडिओत नेमकं काय आहे? सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हीडिओ तुम्ही पाहिलात का? नसेल पाहिला तर ही बातमी तुमच्याच साठी आणि जरी तुम्ही हा व्हीडिओ पाहिला असेल तरी पुन्हा एकदा पाहा…

व्हायरल व्हीडिओ नेमका काय?

युट्यूबर राजा याच्या लग्नातील हा व्हीडिओ आहे. राजाने नुकतंच लग्न केलं. लग्नात नवरी मुलीच्या भांगामध्ये सिंदुर भरताना राजाने एक व्हीडिओ बनवला. दो अनजाने अजनबी…. चले बांधने बंधन… या गाण्यावर राजा व्हीडिओ बनवतो आहे. यात राजा त्याची पत्नी, आई वडील आणि इतर कुटुंबिय दिसत आहेत. मेरी ज़िंदगी मेरी दुनिया Life line My Wife, असं म्हणत राजाने हा व्हीडिओ शेअर केलाय. पण सिंदुर भरण्याचा विधी अर्धवट सोडून व्हीडिओ बनवल्याने नेटकऱ्यानी ट्रोल केलं आहे.

लाखो लाईक्स आणि भन्नाट कमेंट्स

राजाच्या या व्हीडिओला आतापर्यंत दौन कोटी आठ लाख लोकांनी पाहिलं आहे. तर 8 लाख 56 हजार लोकांनी हा व्हीडिओ लाईक केलाय. तर हजारो कमेंट्स या व्हीडिओवर पाहायला मिळत आहेत. खूप चांगला व्हीडिओ बनवतोस भावा, फक्त व्हीडिओ आपलोड नको करत जाऊस, अशी कमेंट एकाने केलीय. तर लग्न काय होत राहील, तू आधी रील बनवून घे…, अशी कमेंट दुसऱ्या नेटकऱ्याने केलीय.

व्हायरल झालेल्या लग्नातील व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या नवरदेवाचं राजा व्लॉग्स नावाने युट्यूब चॅनेल आहे. त्याच्या या युट्यूब चॅनेलला 12 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून तो लाखो रुपये कमावतो. त्यांचे लग्नातील इतर व्हीडिओदेखील प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.