Viral Video : मोबाईल चोरायला गेला अन् स्वतःच अडकला! हिसकावण्याचा प्रयत्नात ट्रेन सुरू झाली अन्… पुढे जे घडलं ते
रेल्वे स्टेशनवर ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल चोरी करताना एक चोर प्रवाशांच्या तावडीच चांगलाच सापडला. चोरी करतानाच ट्रेन सुरू झाली अन् त्या चोराची चांगलीच गोची झाली. फोन चोरी करण्याच्या नादात चोर त्याच्या जीवाला मुकला असता.

मोबाईल चोरायचा प्रयत्न केला अन् लोकांनी असं काही केलं की पुढचे काही क्षण त्या चोराच्या जीवावरच बेतले असते. बिहारमधल्या शिवनारायणपूर रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका तरूणाने चालत्या ट्रेनमधून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरी केल्यानंतर त्याचे असे काही हाल झाले की थेट तिच्या जीवावरच बेतले असते.
नेमकं काय झालं, तर ट्रेन स्टेशनवरून निघत असताना हा तरूण खिडकीत मोबाईल हिसकावून पळण्याच्या प्रयत्नात होता. पण डब्यातील प्रवाशांनी त्याला लगेच पकडलं. चोराला पकडताच ट्रेन चालू झाली. चोर प्रवाशांकडे स्वत:ला सोडण्यासाठी गयावया करू लागला. पण प्रवाशांनी त्याला काही वेळ सोडलेच नाही. प्रवाशांनी धरलेला हात आणि वेगात धावणारी ट्रेन मधल्या मधे चोर असं चित्र निर्माण झालं होतं. हात सोडला तर पडण्याची भीती चोराला होती. त्यामुळे चोराची चांगलीच मधल्यामधे गोची झाली होती.
Shocking: At Shivnarayanpur Railway Station, a thief tried to snatch a mobile phone from a moving train and run away, but he was caught and held through the window https://t.co/Eii1vALd4u
— Ramesh Speaks (@rameshofficial0) October 12, 2026
तो चोर घाबरून प्रवाशांना सोडण्याची विनंती करत होता. मला जाऊद्या मी तुमची माफी मागतो अशी गयावया करत होता. पण प्रवाशांचा राग काही कमी होत नव्हता. काही वेळ त्याला असंच धरून ठेवल्यानंतर ट्रेनचा वेग वाढला आणि चोराचा हात प्रवाशांचा तावडीतून सुटला. त्यानंतर तो चोर प्लॅटफॉर्मवर जोरात आदळला. मोबाईल चोरण्याचा नाद चोराच्या जीवावर बेतला असता.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी चोराची बाजू घेतोय तर कोणी प्रवाशांची. काही जणांचे म्हणाले की चोरी करायला गेला होता ना मग आता भोगा आपल्या कर्माची फळ तर दुसरीकडे चोरी केली म्हणून एखाद्याचा जीव धोक्यात घालायचा का ? असा प्रश्न देखील विचारत आहेत. तर काही जणांच म्हणणं आहे की अशावेळी रेल्वे पोलिसांना बोलवावं. थोडक्यात काय मोबाईल चोरी करण्याच्या नादात घडलेला हा प्रसंग त्या चोराला आयुष्यभर चांगलाच आठवणीत राहिल.
