साडी नेसून Royal Enfield चालवणाऱ्या आजीचा हटके अंदाज ! सोशल मीडियावर ‘बायकर ग्रॅनी’ची जोरदार चर्चा
एक आजीचा व्हिडिओ सध्या लोकांमध्ये जोरात व्हायरल होत आहे, ज्यात ती मराठमोळ्या लूकमध्ये असून रॉयल एनफिल्ड चालवताना दिसते. हे पाहून लोक तिला 'बायकर ग्रॅनी' म्हणून संबोधत आहेत.

सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ असे असतात, जे पाहून नेटकरी थक्क होतात. सध्या अशाच एका आजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत दिसणाऱ्या या आजी चक्क Royal Enfield सारखी दमदार बाईक चालवताना दिसत आहेत. त्यांचा हा अनोखा अंदाज पाहून नेटकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत.
पारंपरिक वेशभूषा अन् हातात Royal Enfield चे हँडल!
साधारणपणे आजी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर साडी नेसलेल्या, घरातील कामांमध्ये व्यस्त असलेल्या महिलेची प्रतिमा उभी राहते. मात्र, या आजींचा अंदाज काहीसा वेगळाच आहे. पारंपरिक मराठमोळा लूक आणि त्यासोबत Royal Enfield सारखी दमदार बाईक चालवण्याची त्यांची स्टाईल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर त्यांना ‘बायकर ग्रॅनी’ म्हणूनही ओळखले जात आहे.
वयाचा अडथळा नाही, छंदाला महत्त्व !
खरंतर, Royal Enfield ही वजनदार आणि दमदार बाईक म्हणून ओळखली जाते. अशी बाईक चालवण्यासाठी आत्मविश्वास, कौशल्य आणि योग्य नियंत्रण असणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत एका वयस्कर महिलेला ही बाईक अगदी आत्मविश्वासाने चालवताना पाहून अनेक जण प्रभावित झाले आहेत. त्यांच्या या अंदाजातून एकच गोष्ट स्पष्ट होते की, आपले छंद जोपासण्यासाठी वय कधीही आडवे येऊ शकत नाही.
आजींच्या स्टाईलवर नेटकरी फिदा !
या आजींच्या लूकमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांच्या पारंपरिक वेशभूषेचा आणि बाईकचा अनोखा मेळ. एका बाजूला मराठमोळ्या संस्कृतीची झलक, तर दुसऱ्या बाजूला बाईक चालवण्याची आवड आणि आत्मविश्वास! या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी ओळख देत आहे.
खरं तर, वय वाढलं म्हणून आपले छंद आणि आवडी बाजूला ठेवण्याची गरज नाही. आयुष्यात कोणतीही गोष्ट करण्यासाठी स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. या आजींचा बाईक चालवतानाचा अंदाज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा संदेश देत आहे.
इथे पहा व्हिडीओ