VIDEO : अजनार नदी साफ करता करता बिट्टू तबाहीची प्रकृती बिघडली; हातापायांना गंभीर….. नेटकऱ्यांकडून चिंता व्यक्त
बिट्टूटा हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चिंतेत पडले आहेत. अनेकांनी त्याला आधी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. प्रदषित पाण्यात उतरताना योग्य सुरक्षा साधनं वापरणं गरजेचं आहे.असे अनेकांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर बिट्टू तबाही नावाने प्रसिद्ध असलेल्या 21 वर्षाीय तरूणाने अजनार नदी साफ करण्याचा विडा उचलला होता, त्याच्या या मेहनतीमुळे नदीला जीवनदान मिळाले होते. पण लोकांनी पुन्हा त्यात कचरा टाकायला सुरूवात केली. बिट्टू पुन्हा पाण्यात उतरला. पण या घाणेरड्या नदीच्या स्वच्छेतेमुळे त्याची त्वचा खराब झाली आहे.
मध्य प्रदेशातील ब्यावरा येथील बिट्टूने 26 जानेवारी 2026 पासून अजनार नदी स्वच्छ करण्यास सुरूवात केली. नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या,पिशव्या,शेवाळ साचला होता. हा सगळा कचरा बाहेर काढण्यासाठील त्याने स्वत:हून काम सुरू केलं. हा सगळा कचरा बाहेर काढण्यासाठी त्याने स्वत:हून काम सुरू केलं. सुरूवातीला त्याच्याकडे विशेष यंत्रसामग्री किंवा मोठी टिम नव्हती.हातमोजे, बूट, काठी आणि साधनांच्या मदतीने तो नदी स्वच्छ करत होता. काही वेळा तर त्याने हातानेच कचरा बाहेर काढला आहे
हातापायांची त्वचा सोलवटली, सतत खाज आणि वेदना
मात्र प्रदुषित पाणी आणि कुजलेल्या कचऱ्याच्या सतत संपर्कात राहण्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागत आहे. बिट्टूने इन्स्टाग्रावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याच्या हातापायांची त्वचा निघून गेल्याची दिसत आहे आणि त्वचेवर संसर्गासारखी लक्षणं दिसत आहेत. त्याला सतत खाज आणि वेदनांचाही त्रास होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा त्रास इतका वाढत चालला आहे की त्याला औषधं सुरू करावी लागली. त्याच्या आई वडिलांनाही त्याच्या प्रकृतीची चिंता वाटू लागली आहे
विशेष म्हणजे एवढा त्रास होत असतानाही बिट्टूने नदी स्वच्छ करण्याचं काम सोडलेलं नाही. नदीत पुन्हा कचरा टाकला जात असल्याने त्याची मेहनत वाया जात असल्याची खंतही त्याने व्यक्त केली आहे.
नेटकऱ्यांकडून काळजी व्यक्त
बिट्टूचा हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चिंतेत पडले आहेत. अनेकांनी त्याला आधी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. प्रदषित पाण्यात उतरताना योग्य सुरक्षा साधनं वापरणं गरजेचं आहे.असे अनेकांनी म्हटले आहे.