AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

65 वर्षांपूर्वीचे उषा मंगेशकरांचे ते गाणं आजही ऐकून डोळ्यात येतं पाणी, लोकांच्या प्ले लिस्टमध्ये आजही

सध्या बॉलिवूडमधील एक गाणे हे चांगलेच ट्रेंडमध्ये आहे. हे गाणे ६५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऐकताच अनेकांच्या डोळ्यात पाणी येते.

65 वर्षांपूर्वीचे उषा मंगेशकरांचे ते गाणं आजही ऐकून डोळ्यात येतं पाणी, लोकांच्या प्ले लिस्टमध्ये आजही
Usha Mangeshkar SongImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 1:44 PM
Share

बॉलिवूडमधील गाणी ही कायमच चर्चेत असतात. ही गाणी संपूर्ण जगात व्हायरल होताना दिसतात. अनेक परदेशी चाहत्यांना गाण्यात वापरलेल्या शब्दांचा अर्थ माहिती नसतो. तरीही ते बॉलिवूडची गाणी मनापासून ऐकतात. असेच एक इतर भाषेतील गाणे सध्या ट्रेंडमध्ये आहे. हे गाणे ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी येते. आता हे गाणे कोणते? चला जाणून घेऊया…

सन १९६१ मध्ये मगही भाषेत एक चित्रपट आला होता, ज्याचे नाव होते ‘भैया.’ काही ठिकाणी ‘भैयाजी’ असेही लिहिले गेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फनी मुजूमदार यांनी केले होते. अभिनेता तरुण बोस यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिनेत्री विजेता चौधरी, शुभा खोटे, अचला सचदेव यांसारख्या अभिनेत्रींनी काम केले होते. खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात सलमान खानची सावत्र आई हेलेनही होती. त्यांनी चित्रपटात एक नर्तिका आणि गायिकाची भूमिका साकारली होती. या ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटात छठ पूजेचे संपूर्ण दृश्य दाखवले गेले आहे. छठी मैयासाठी गाणेही गायले आहे. या गाण्याचे बोल आहेत ‘सुपवे नरियरवे’. हे गाणे ऐकून लोक इमोशनल होत असत. गाणे लता मंगेशकर यांच्या बहिण उषा मंगेशकर यांनी आपल्या आवाजात गायले होते. चित्रगुप्त यांचे संगीत होते. हे गाणे विद्यावाशिनी देवी आणि प्रेम धवन यांनी लिहिले होते.

चित्रपटात काय दाखवण्यात आले आहे?

खास गोष्ट म्हणजे चित्रपटात दाखवलेले हे छठी मैयाचे गाणे बिहारच्या गया येथे शूट झाले होते. ६० च्या दशकात सिनेमा पुढे जात होते. नवीन प्रकारचे चित्रपट, गाणी आणि तंत्रज्ञान सिनेमात आणले जात होते. त्याच काळात बिहारच्या संस्कृतीला जगभर नेणारा छठ महापर्व पहिल्यांदा कोणत्याही चित्रपटाचा भाग बनला होता. लोकगीत, भक्ती हे या चित्रपटाचा भाग होते. आज शारदा सिन्हा यांच्या आवाजातील गाणी ऐकली जातात. पण तो काळ होता जेव्हा छठी मैयाचे गाणे कोणत्याही चित्रपटात ऐकले गेले होते.

चित्रपटाची काय आहे कथा?

‘भैया’ चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर ती परमानंद नावाच्या एका पात्राभोवती गुंफलेली होती, जो गरिबीचा मार सहन करत असतो. त्याची एक विधवा सावत्र आई माया आणि दोन सावत्र भाऊ-बहीण. परमानंदला बिंदूवर प्रेम होते आणि तो आशा बाळगतो की कधीतरी तो तिच्याशी लग्न करेल. परमानंदचा सावत्र भाऊ मुरली जेव्हा दुसऱ्या शहरातून शिक्षण घेऊन परततो तेव्हा त्यालाही बिंदूवर प्रेम होते. हे कळल्यावर परमानंद मागे हटतो. नंतर अनेक गैरसमज निर्माण होतात आणि सुखद शेवटासह चित्रपट संपतो. हा मगही भाषेत बनलेला सर्वात खास चित्रपट मानला जातो.

Follow Us
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare : सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहा, अन्यथा....
पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राज
Manoj Jarange Patil : पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत..
Raj Thackeray Speech : महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत परखड भाष्य; नेमकं काय म्हणाले?
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या संघर्षविरोधात...
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
Gokul : सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
गोकुळच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी..
Gokul Protest : गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी अन् पारंपरिक साहित्य घेऊन रस्त्यावर
गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! अनेक वकील....
Gokul : गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! कोल्हापुरातील अनेक वकील थेट रस्त्यावर; सरकारी हस्तक्षेपाविरोधात एकजुटीने सहभाग
गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी....
Gokul Protest : गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी पायताण, यमराजाची वेशभूषा अन्..., सतेज पाटलांच्या मोर्चाची राज्यभर चर्चा