AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varsha Usgaonkar: तो डोक्याने कमीच… आमिर खानच्या छोट्या भावाबद्दल स्पष्टच बोलल्या वर्षा उसगांवकर

Varsha Usgaonkar: मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता आमिर खान याचा छोटा भाऊ फैजल खान याच्यासोबत काम करताना आलेला अनुभव सांगितला.

Varsha Usgaonkar: तो डोक्याने कमीच... आमिर खानच्या छोट्या भावाबद्दल स्पष्टच बोलल्या वर्षा उसगांवकर
Varsha Usgaonkar,
| Updated on: Nov 09, 2026 | 1:43 PM
Share

Varsha Usgaonkar: मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी फक्त मराठी सिनेमांमध्येच नाही तर, हिंदी सिनेविश्वावर देखील राज्य केलं. ‘दूध का कर्ज’, ‘साथी’, ‘शिकारी’, ‘हफ्ता बंद’, ‘हनीमून’, ‘तिरंगा’ यांसारख्या अनेक हिंदी सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता वर्षा मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील वर्षा यांनी अभिनेता आमिर खान याचा छोटा भाऊ फैजल खान याच्यासोबत काम करताना आलेला अनुभव सांगितला. यावेळी वर्षा म्हणाल्या, ‘तो मला थोडा डोक्याने कमीच वाटला…’, तर जाणून घ्या वर्षा उसगांवकर असं म्हणाल्या तरी काय?

वर्षा उसगांवकर एका नाटकाचा किस्सा सांगतम म्हणाल्या, ‘आमिर खानचा छोटा भाऊ मी त्याच्यासोबत एक नाटक केलं. ‘बस एक हम है, बस एक तुम हो’ अशा नावाचं नाटक होतं. त्या नाटकामध्ये आम्ही दोघेच होतो. दोनपात्री ते नाटक होतं. आमिर खान आला ते नाटक बघायला… मी स्टेजवरची असल्याने मला तो आत्मविश्वास होताच. तेव्हा तो (फैजल खान) मला येऊन काय म्हणाला, ‘वर्षा एकही डायलॉग विसरता कामा नेये….’, मी त्याला म्हणाले, तू मला सांगतोयस डायलॉग विसरु नकोस, आपण रिहर्सल का करतोय? त्याच्यासाठीच आपण रिहर्सल करतोय ना… तावातावात तो बोलू लागला. मला कळू लागलेलं, याला जेलसी होत आहे…

‘तो मला थोडा डोक्याने कमीच वाटला…’ – वर्षा उसगांवकर

‘मला असं वाटलं तो डोक्याने थोडा कमीच आहे… मला सतत सांगायचा डायलॉग विसरु नकोस आणि एक प्रयोगात तो स्वतःच विसरला… त्यानंतर मला येऊन सांगतो, मी तुला विसरु नको सांगत होतो आणि मीच डायलॉग विसरलो. तेव्हा मी सुद्ध त्याला म्हणाले, काही नाही कधीतरी होतं असं… त्यानंतर आमिर खान माझ्या जवळ आला आणि म्हणाला, ‘तू चांगला अभियन केलास…”

पुढे वर्षा उसगांवकर म्हणाल्या, ‘दुसऱ्या दिवशी तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला, आपण आता एटिट्यूड बदलायला हवाय, मी त्याला स्पष्ट सांगितलं, उद्या प्रयोग आहे आणि आता तू मला बदल करायला सांगतोय… ते मला जमणार नाही, तू मला नाटकातून काढलं तरी चालेल…’, सध्या सर्वत्र वर्षा उसगांवकर यांची चर्चा सुरु आहे..

फैजल खान आता काय करतो?

काही महिन्यांपूर्वी फैजल खान याने कुटुंबियांवर विशेषतः आमिर खान याच्यावर गंभीर आरोर केलेले. पण त्यानंतर फैजलने उघडपणे त्याच्या चुका मान्य केल्या आणि त्याने आई, भाऊ आमिर खान, बहीण निखत आणि मेहुणा संतोष हेगडी यांची जाहीर माफी मागितलेली. सांगायचं झालं तर, आमिरप्रमाणेच त्याचा भाऊ फैजल खानलाही सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख बनवायची होती. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. फैजल आमिरसोबत ‘मेला’ या चित्रपटात दिसला होता. मात्र त्यानंतर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच कायम चर्चेत राहिला.

Follow Us
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare : सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहा, अन्यथा....
पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राज
Manoj Jarange Patil : पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत..
Raj Thackeray Speech : महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत परखड भाष्य; नेमकं काय म्हणाले?
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या संघर्षविरोधात...
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
Gokul : सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
गोकुळच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी..
Gokul Protest : गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी अन् पारंपरिक साहित्य घेऊन रस्त्यावर
गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! अनेक वकील....
Gokul : गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! कोल्हापुरातील अनेक वकील थेट रस्त्यावर; सरकारी हस्तक्षेपाविरोधात एकजुटीने सहभाग
गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी....
Gokul Protest : गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी पायताण, यमराजाची वेशभूषा अन्..., सतेज पाटलांच्या मोर्चाची राज्यभर चर्चा
रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा...
Gokul : रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा