अजब चोर की गजब कहानी! चोरी करून थकला आणि तिथेच झोपला ; जाग आल्यावर जे पाहिलं..

एका चोराने शाळेत शिरून कॅश काउंटर आणि कलेक्शन बॉक्स तोडले. चोरी केली आणि नंतर तो तिथेच आतमध्ये झोपी गेला. मात्र सकाळी जाग आल्यावर त्याला ..

अजब चोर की गजब कहानी!  चोरी करून थकला आणि तिथेच झोपला ; जाग आल्यावर जे पाहिलं..
| Updated on: Oct 07, 2025 | 2:46 PM

चोर… नाव एकूनचं अनेकांचं धाबं दणाणतं, पण केरळच्या तिरअनंतपुरममध्ये मात्र एका चोराची अजब कहाणी समोर आली आहे. तिथे एक चोर शाळेत चोरी करण्यासाठी घुसला, चोरी तर केली पण धक्कादायक गोष्ट म्हणजे तो चोरी करून त्याच शाळेच्या परिसरातच झोपून गेला. त्याला एवढी गाढ झोप लागली की सकाळ कधी झाली ते त्याला कळलंच नाही. पण सकाळी जाग आल्यावर डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून तो हबकलचा. कारण तो पकडला गेला होता आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

ही घटना अटिंगल येथे घडली, जिथे चोर सीएसआय इंग्लिश मीडियम स्कूलमधून चोरी केल्यानंतर शाळेत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी परत आले आणि त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी त्याला अटक केली. चोराचे नाव विनेश असे (23 वर्ष) असं असून तो अटिंगल येथील रहिवासी आहे. शुक्रवारी रात्री विनेश चोरीच्या उद्देशाने शाळेत घुसला. त्याने अनेक खोल्या फोडल्या, त्यांची झडती घेतली आणि कॅश काउंटर उघडले. एवढंच नव्हे तर त्याने यूपीएस आणि पॅलिएटिव्ह केअर कलेक्शन बॉक्स देखील फोडले आणि त्यात असलेले पैसे चोरले. पण चोरीनंतर तिथून जाण्याऐवजी तो तिथेच गाढ झोपून गेला.

सुरक्षा रक्षकांना शाळेत दिसला चोर

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सुरक्षा रक्षक शाळेत आले, तेव्हा त्यांना चोरीच्या खुणा दिसल्या. कॅश काउंटर तुटलेले होते आणि लॉकर उघडे होते. यामुळे सुरक्षा रक्षकाला चोरीचा संशय आला. त्यानंतर तो हायर सेकंडरी वर्गांच्या मजल्यावर गेला असता, तिथे मुलांच्या टॉयलेटजवळ जमिनीवर त्यांना एक तरुण झोपलेला दिसला. जवळच पैसे, एक यूपीएस आणि काही शस्त्रंही पडलेली होती.

पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ते पाहून सुरक्षा रक्षकांनी लगेचच पोलिसांना आणि शाळा प्रशासनाला घटनेची माहिती दिली. ते ऐकून पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. चोराला उठवून पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा विनेशने पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही.
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले आणि नंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आले.

अशा प्रकारच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत, ज्यात चोरांच्या विचित्र कारनाम्यांचा खुलासा झाला आहे. एका चोराने चोरी केली पण एसी सुरू असल्याने याला तिथेच झोप लागली. सकळी मग त्याला पोलिसांनी अटक केली. त्याचप्रमाणे, दुसऱ्या एका घटनेत दुकानातून चोरी केल्यानंतर एका चोराला तिथेच झोप लागली. शिवाय, आणखी एका घटनेत चोरांनी एकदा घरात चोरी तर केलीच पण त्यांनी तिथल्याच स्वयंपाकघरात अन्न शिजवलं आणि ते तिथेच जेवले.