VIDEO | सिगारेट पेटवली अन् भडाका झाला, तोंड भाजलं, व्हिडीओ पाहून…

सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीला तुम्ही सिगारेट पेटवत असताना पाहत आहात, जेव्हा तो सिगारेट पेटवायला जातो. मग काय होतं हे व्हिडीओत पाहा.

VIDEO | सिगारेट पेटवली अन् भडाका झाला, तोंड भाजलं, व्हिडीओ पाहून...
viral news
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 07, 2023 | 9:54 AM

मुंबई : आपल्या आजूबाजूला अनेक लोकं सिगारेट (cigarette) ओढत असल्याचे पाहायला मिळते. सिगारेट हे आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं माहित असूनही अनेक लोकं सिगारेट पीतातं. सिगारेटच्या अतिसेवनामुळे कॅन्सर (Cancer) होण्याची दाट शक्यता असते. सिगारेटच्या बाबतील इथं अधिक जनजागृती करताना कोणी दिसत नाही. त्याचबरोबर अनेकजण लागलेली आपली सवय सोडवण्याचा खूप प्रयत्न करतात. परंतु त्यांना व्यसन सोडणं शक्य होत नाही. सोशल मीडियावर सध्या असे अनेक व्हिडीओ व्हायरल (Smoking Viral Video) झाले आहेत. त्यामध्ये अनेक आपल्या अनोख्या शैलीने सिगारेट ओढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती सिगारेट ओढण्यासाठी दुकानात गेली आहे. ज्यावेळी सिगारेट पेटवण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करते, त्यावेळी आगीचा भडाका उडतो. हा सगळा प्रकार पाहून अनेक सिगारेट ओढणाऱ्यांना घाम फुटला असल्याचे अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितले आहे.

सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे धुम्रपान काहीवेळ आपण थांबवू शकतो असं वाटतंय. व्हायरल झालेला व्हिडीओ ट्विटरवरती @OnlyBangersEth नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये आपण एका व्यक्तीला आपण सोप्यावर बसल्याचे आपण पाहू शकतो. त्यानंतर अचानक तो टेबलच्या जवळ जातो. सिगारेट काढून तो पेटवू लागतो.

ज्यावेळी ती व्यक्ती लाईटर पेटवते. अचानक तिथं मोठा भडाका झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. तिथं आजूबाजूला असलेले लोकं सुध्दा घाबरले आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ चार लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओ कायम कमेटं येत आहेत. एक नेटकरी म्हणतो, आतमध्ये कुठूनतरी गॅस लिक असावा. त्याची माहिती नसताना त्याने लाईटर पेटवला. त्यामुळे आग लागली. सध्या अनेक नेटकरी त्या व्हिडीओ खाली कमेंट करुन सल्ला देत आहेत.