Viral : डान्स करताना मुलासोबत घडलं असं काहीतरी, Video पाहून हसू आवरणार नाही

आता एका मुलाला डान्स (Dance) करून काहीतरी वेगळं करायचं होतं. पण, त्याच्यासोबत झालेला खेळ पाहून लोक हसतायत. कारण, स्टाइल मारण्याच्या नादात त्या मुलानं स्वत:चं हसं करून घेतलं.

Viral : डान्स करताना मुलासोबत घडलं असं काहीतरी, Video पाहून हसू आवरणार नाही
मुलाचा डान्स
| Updated on: Jan 17, 2022 | 6:36 AM

आजकाल लोकांना प्रसिद्ध होण्याचं वेड लागलं आहे. यासाठी लोकांना नेहमी काहीतरी वेगळं करायचं असतं. कधी यात लोकांना यश मिळतं, तर कधी हशा होतो. सोशल मीडिया(Social Media)वरही त्याचे व्हिडिओ (Video) मग व्हायरल (Viral) होतात. आता एका मुलाला डान्स (Dance) करून काहीतरी वेगळं करायचं होतं. पण, त्याच्यासोबत झालेला खेळ पाहून लोक हसतायत. कारण, स्टाइल मारण्याच्या नादात त्या मुलानं स्वत:चं हसं करून घेतलं. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडलाय. तो पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे.

एका कार्यक्रमातला व्हिडिओ

काही सेकंदांचा हा व्हिडिओ कोणत्यातरी फंक्शनमधला आहे, ज्यामध्ये काही मुलं स्टेजवर नाचत आहेत. व्हिडिओमध्ये असं दिसतं, की एका मुलगा डान्स करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तो जे कारतो, त्यात सपशेल फेल जातो, आणि मग मित्रांमध्ये त्याचं हसं होतं.

डान्स करता करता…

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा वेगळ्या पद्धतीनं डान्स करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं. लोकही प्रोत्साहन देत आहेत. पण, असं काहीसं घडतं की लोक त्याला हसतात. डान्स करता करता तो पडतो.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्सना हसू आवरत नाहीय. यामुळेच लोकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका यूझरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलंय, की ‘भाई पंडाल ने तेरा क्या बिगाड़ा था.’ तर दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, की ‘ओ भाई…ओ भाई, क्या करके मानेगा.’ दुसऱ्या यूझरनं कमेंटमध्ये लिहिलंय, की ‘हा व्हिडिओ मस्त आहे. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘giedde’ नावानं शेअर करण्यात आलाय. हा मजेशीर व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे.

हॅलो श्रीनगर, बाय बाय स्वित्झर्लंड… आनंद महिंद्रांनी शेअर केले हुडहुडी भरवणारे सुंदर Photos

Viral : यूझर्सना भावला मांजरीचा ‘किलर कम इमोशनल’ लूक, पुन्हा पुन्हा पाहाल ‘हा’ Video

Shocking : …आणि अचानक कोसळतो पूल, हा Viral Video पाहून अंगावर काटा येईल