Viral : यूझर्सना भावला मांजरीचा ‘किलर कम इमोशनल’ लूक, पुन्हा पुन्हा पाहाल ‘हा’ Video

Viral : यूझर्सना भावला मांजरीचा 'किलर कम इमोशनल' लूक, पुन्हा पुन्हा पाहाल 'हा' Video
मांजर

सोशल मीडिया(Social Media)च्या या जगात या प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा व्हायरल (Viral) होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, तो पाहून तुम्हालाही हसायला येईल.

प्रदीप गरड

|

Jan 16, 2022 | 2:18 PM

एक काळ होता जेव्हा लोक कुत्रा, मांजर, घोडा, हत्ती असे प्राणी पाळत असत. आपण कुत्र्यांबद्दल बोललो तर ते हजारो वर्षांपासून मानवीच्या सोबत आहेत. मांजरी(Cat) ही या बाबतीत कमी नाहीत. मांजरीदेखील हजारो वर्षांपासून मानवाच्या साथीदार आहेत. सोशल मीडिया(Social Media)च्या या जगात या प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा व्हायरल (Viral) होतात, ज्यात काही भावनिक तर काही खूप मजेदार असतात. ते पाहून तुम्हाला हसायला येवू शकतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, तो पाहून तुम्हालाही हसायला येईल.

तिला आला राग

हा व्हिडिओ दोन मांजरींचा आहे, ज्यामध्ये त्यांचा केअरटेकर एका मांजरीला खूप प्रेमानं गोंजारतोय. ती देखील त्याचा आनंद घेतेय. त्याचवेळी दुसरी मांजर त्यांच्याकडे पाहतेय. यावेळी तिला खूप राग आलाय, आश्चर्य वाटतंय, असे तिचे हावभाव आपल्याला दिसून येतायत. सहसा असं आपण लहान मुलांमध्ये पाहतो. जेव्हा एका मुलाला त्याची आई कुरवाळत असते, त्यावेळी दुसऱ्याला राग येतो, तो चिडतो. असाच काहीसा प्रकार इथं झालाय. ही मांजरही चिडलीय.

ट्विटरवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @buitengebieden_ या आयडीनं शेअर करण्यात आलाय. कॅप्शनमध्ये लिहिलंय, की विश्वासघाताचे हावभाव. अवघ्या 8 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाख 61 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. तर 27 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलंय.

कमेंट्सही मजेशीर

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी छान आणि मजेदार कमेंट्सदेखील केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की इस नन्हे-मुन्नों को दिल से आशीर्वाद… मुझे जानवरों से प्यार है’, तर दुसऱ्या यूझरनं कमेंट केली, ‘जेव्हा माझे पती सोफ्यावर माझ्या जवळ बसतात आणि मला मिठी मारतात तेव्हा आमच्या पाळीव कुत्र्याचे हावभावही असेच असतात. त्याचप्रकारे आणखी एका यूझरनं लिहिलंय, की ‘तिचे उदास डोळे सर्व काही सांगत आहेत’.

लाकूडतोड करणारा मजूर एका रात्रीत झाला करोडपती, बिहारच्या किशनगंजमध्ये अफवांना ऊत; चौकशीही होणार

Shocking : …आणि अचानक कोसळतो पूल, हा Viral Video पाहून अंगावर काटा येईल

Video : ‘बाहुबली’च्या गाण्यावर चिमुरडीचा अप्रतिम क्लासिकल डान्स; हावभाव पाहून लोक म्हणाले, अप्रतिम, अद्भुत..!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें