Video : ‘बाहुबली’च्या गाण्यावर चिमुरडीचा अप्रतिम क्लासिकल डान्स; हावभाव पाहून लोक म्हणाले, अप्रतिम, अद्भुत..!

Video : 'बाहुबली'च्या गाण्यावर चिमुरडीचा अप्रतिम क्लासिकल डान्स; हावभाव पाहून लोक म्हणाले, अप्रतिम, अद्भुत..!
चिमुरडीचं शास्त्रीय नृत्य

सोशल मीडिया(Social Media)वर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतील, ज्यामध्ये ही मुलं आपली क्षमता सिद्ध करतात. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होतोय. हा पाहून तुम्हीही म्हणाल ही मुलगी किती टॅलेंटेड आहे.

प्रदीप गरड

|

Jan 16, 2022 | 11:59 AM

भारतीय लोक प्रतिभांनी परिपूर्ण आहेत. मोठ्यांमधला मोठेपणा तर आपण पाहतोच, मात्र मुलंही कमालीची प्रतिभावान आहेत. विशेषत: गाण्याची आणि नृत्याची मुलांमध्ये खूप क्रेझ आहे. एक काळ असा होता जेव्हा बहुतेक लोक या क्षेत्रात करिअर करण्याचा विचारही करू शकत नव्हते, परंतु आजच्या काळात ते त्यांच्यासाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून उदयास आलं आहे. मुलं आपल्या कलागुणांच्या जोरावर आपली छाप पाडत आहेत. सोशल मीडिया(Social Media)वर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतील, ज्यामध्ये ही मुलं आपली क्षमता सिद्ध करतात. गायन, नृत्याच्या जोरावर आपला दबदबा निर्माण करतात. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होतोय. हा पाहून तुम्हीही म्हणाल ही मुलगी किती टॅलेंटेड आहे.

कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत

व्हिडिओमध्ये बाहुबली चित्रपटातील ‘कौन है वो कौन है वो कहां से वो आया’ या गाण्यावर एक लहान मुलगी जबरदस्त शास्त्रीय नृत्य करताना दिसतेय. शास्त्रीय नृत्य हे सोपं काम नाही. कधीकधी लोकांना ते शिकण्यासाठी वर्षे लागतात. पण ती मुलगी ज्या पद्धतीनं नाचतेय ते पाहून तिचं कौतुक केल्याशिवाय आपण राहत नाहीत.

ट्विटर हँडलवर शेअर

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नृत्यादरम्यान मुलीचे हावभाव किती अप्रतिम आहेत. तिला गाण्याचे बोल योग्यरित्या समजले आहेत आणि त्यानुसार ती नृत्यही करतेय. हा जबरदस्त व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय. कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘छोटी सी उम्र और ग्रैंड मास्टर जैसी प्रस्तुति! बच्ची ने नृत्य से मंत्रमुग्ध कर दिया’.

सोशल मीडियावर कौतुक

अवघ्या 1 मिनिट 45 सेकंदाच्या या व्हिडिओनं लोकांना खरोखरच मंत्रमुग्ध केलंय. सोशल मीडिया यूझर्सनी मुलीच्या डान्सचं कौतुक केलंय. एका यूझरनं लिहिलंय, की खूप छान, तुझं नृत्यकौशल्य मंत्रमुग्ध करणारं आहे. तर इतर अनेक यूझर्सनी मुलीच्या नृत्याचं वर्णन ‘अप्रतिम’, ‘उत्कृष्ट’ असं केलं आहे.

Viral : अप्रतिम व्हॉलिबॉल खेळणाऱ्या चिमुरड्याचा Video पाहून यूजर्स म्हणतायत, ‘ये बच्चा नहीं बिजली है’

VIDEO : पॅराग्लायडिंग करताना मुलीला फुटला घाम, इन्स्ट्रक्टरला म्हणाली – ‘मला खाली पाहू देऊ नकोस’

Love Story | एका वर्षापूर्वी बायको गेली, तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 कोटीची संपत्ती दान

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें