Video | नवरदेव वरात घेऊन आला, नवरीने केलं भलतंच काही, मजेदार व्हिडीओ पाहाच

व्हिडीओमध्ये लग्न समारंभादरम्यान नवरी- नवरदेवामध्ये उडालेली धम्माल अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे.

Video | नवरदेव वरात घेऊन आला, नवरीने केलं भलतंच काही, मजेदार व्हिडीओ पाहाच
BRIDE AND GROOM VIRAL VIDEO
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jul 31, 2021 | 4:02 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अगदीच विशेष आहे. या व्हिडीओमध्ये लग्न समारंभादरम्यान नवरी- नवरदेवामध्ये उडालेली धम्माल अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओची समाजमाध्यमांवर विशेष चर्चा होत आहे. (bride and groom throwing rice towards each other video went viral on social media)

नवरी-नवरदेव एकमेकांकडे तांदूळ फेकत आहेत

सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ अगदी विशेष आहे. या व्हिडीओमध्ये प्रत्यक्ष लग्न होण्याआधीच नवरी आणि नवरदेवामध्ये मजेशीर भांडण सुरु आहे. हे दोघेही एकमेकांकडे खोडकर पद्धतीने तांदूळ फेकत आहेत. या आगळ्यावेगळ्या प्रथेचा व्हिडीओ सोशल मीडियीवर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा लग्नसमारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरीला तिच्या घरच्यांनी उचलून धरलेले आहे. तर नवरदेव घोड्यावर मोठ्या ऐटीत बसला आहे. हे दोघेही एकमेकांपासून बरेच दूर आहेत. एकमेकांपासून दूर उभे असले तरी यावेळी ते शांतपणे उभे नाहीयेत. तर ते एकमेकांवर तांदूळ फेकत आहेत. आधी नवरदेव नवरीच्या अंगावर तांदूळ भिरकावत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर नवरदेवाने खोड काढल्यामुळे नवरीसुद्धा नवरदेवाकडे तांदूळ भिरकावत आहे. हा मजेदार प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. एकमेकांकडे तांदूळ फेकण्याचा प्रकार ही प्रथा आहे की दुसरं काही याची माहिती मिळू शकलेली नाही.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मात्र, व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेला हा प्रकार नेटकऱ्यांना अतिशय मजेदार वाटत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही लोकांनी तर या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे विविध समाजमाध्यमांवर शेअर केले आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही, मात्र, त्याला mr_mrs._jain इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Viral Video : डान्सिंग आजीचा सोशल मीडियावर थाट, 78 वर्षीय कृष्णकुमारी तिवारीचा हा व्हिडीओ नक्की बघा…

भारतातील सर्वात तिखट मिरची लंडनच्या बाजारात, पंतप्रधान मोदी ट्विट करुन म्हणाले…

Video | त्याला रुग्णवाहिकेतून बाहेर काढलं, काही क्षणात स्ट्रेचरवरुन उठला अन् पळायला लागला, व्हिडीओ व्हायरल

(bride and groom throwing rice towards each other video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें