भारतातील सर्वात तिखट मिरची लंडनच्या बाजारात, पंतप्रधान मोदी ट्विट करुन म्हणाले…

King Chilly| ही मिर्ची गुवाहाटीमधून पाठवण्यात आली आहे. या मिरचीची पहिली खेप नुकतीच लंडनमध्ये पोहोचली. आता आगामी काळात ही मिरची लंडनवासियांच्या कितपत पसंतीस उतरणार, हे पाहावे लागेल.

भारतातील सर्वात तिखट मिरची लंडनच्या बाजारात, पंतप्रधान मोदी ट्विट करुन म्हणाले...
भूत जोलकिया मिरची
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 29, 2021 | 11:26 AM

नवी दिल्ली: नागालँडमध्ये ‘किंग चिली’ किंवा ‘भूत जोलकिया’ या नावाने ओळखली जाणारी मिरची पहिल्यांदाच लंडनच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे. अत्यंत तिखटपणासाठी ही मिरची प्रसिद्ध आहे. किंबहुना ही जगातील सर्वात तिखट मिर्ची असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खास ट्विट करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, अतिश्य उत्तम बातमी. ज्या लोकांनी भूत जोलकिया मिरची खाल्ली आहे त्यांनाच या मिरचीच्या तिखटपणाची कल्पना आहे, असे मोदींनी म्हटले. तर वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनीही ईशान्य भारतातील मिरची लंडनमध्ये पोहोचल्याचे म्हटले आहे.

ही मिर्ची गुवाहाटीमधून पाठवण्यात आली आहे. या मिरचीची पहिली खेप नुकतीच लंडनमध्ये पोहोचली. आता आगामी काळात ही मिरची लंडनवासियांच्या कितपत पसंतीस उतरणार, हे पाहावे लागेल.

जगातील सर्वात तिखट मिरची

Scoville हीट यूनिट (SHUs) नुसार भूत जोलकिया ही जगातील सर्वात तिखट मिरची आहे. 2008 साली ही मिरची प्रमाणित करण्यात आली होती. जुलै 2021 मध्ये लंडनमध्ये या मिरचीचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर लंडनमधून या मिरचीसाठी ऑर्डर आली. ही मिरची पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने पिकवण्यात आली आहे. ही मिरची लवकर खराब होत असल्याने तिची निर्यात करण्यात अनेक समस्या होत्या. मात्र, या सर्व अडचणींवर मात करुन नागालँड कृषी बाजार समितीने ही मिरची लंडनमध्ये पाठवली.

संबंधित बातम्या:

सोयाबीनला विक्रमी झळाळी, क्विंटलचा दर 9 हजारांच्या पार, उच्चांकी दराचा फायदा नेमका कुणाला?

औषधी गुणांनी संपन्न, अनेक आजारांवर गुणकारी, शेवग्याच्या शेतीतून आर्थिक कमाईची संधी, वाचा सविस्तर

शेतातील कष्टाशी नियोजनाची सांगड, कुटुंबीयांची भक्कम साथ; जळगावच्या पाटील बंधूंची डाळिंबातून 50 लाखांची कमाई

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें