Video | आधी दूध पिलं नंतर घेतली मड थेरेपी, छोट्याशा गेंड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका माणसाळलेले गेंड्याचे पिल्लू दाखवण्यात आले आहे. हे पिल्लू पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Video | आधी दूध पिलं नंतर घेतली मड थेरेपी, छोट्याशा गेंड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
rhino viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ चांगलेच मजेदार असतात. तर काही व्हिडीओंमध्ये अचंबित करुन टाकणाऱ्या गोष्टी दाखवलेल्या असतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक माणसाळलेले गेंड्याचे पिल्लू दाखवण्यात आले आहे. हे पिल्लू पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (rhino drinking milk and taking mud therapy video went viral on social media)

मालकाने गेंड्याची केली मड तेरेपी

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अगदीच खास आहे. व्हिडीओमध्ये आपल्याला गेंड्याचे एक छोटे पिल्लू दिसत आहे. हे पिल्लू चांगलेच माणसाळलेले आहे. या पिल्लाने सुरुवातीला आपल्या मालकाच्या हाताने दूध पिलं आहे. तसेच त्यानंतर कंटाळवाणं वाटल्यामुळे त्याने मालकाकडून मड थेरेपी करुन घेतली आहे. हा छोटासा गेंडा चिखलात मस्तपैकी लोळत असल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसत आहे. नंतर थोडं फ्रेश वाटल्यानंतर हा छोटासा गेंडा चांगलाच हुंदडत आहे.

गेंडा वाळलेल्या गवतावर पहुडला

गेंडा हा मुळात जंगली प्राणी असल्यामुळे त्याच्या आवडीनिवडीची काळजी घेणे गरजेचे आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन गेंड्याच्या मालकाने त्याच्या राहण्याची सोय केली आहे. व्हिडीओमध्ये गेंडा वाळलेल्या गवतावर पहुडल्याचे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हा गेंडा खूप चांगला असल्याचे म्हटलेय. तर काहींनी हा व्हिडीओ अप्रतिम आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

‘ओsss शेठ’ नादच केलाय थेट, महाराष्ट्राचं नवं सुपरहिट गाणं ऐकलंत का? राज ठाकरेंच्या हस्तेही सत्कार

Video | लाल साडीत महिलेच्या कोलांट उड्या, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Video | मैदानात उतरण्यापूर्वी कोचने खेळाडूच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ एकदा पाहाच

(rhino drinking milk and taking mud therapy video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI