Viral Video : डान्सिंग आजीचा सोशल मीडियावर थाट, 78 वर्षीय कृष्णकुमारी तिवारीचा हा व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झालेल्या या व्हिडीओमध्ये एक आजी डान्स करताना दिसतेय. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या आजीला पाहून प्रत्येकजण स्तब्ध आहेत. (78-year-old Krishnakumari Tiwari's dance video went viral on social media, watch this video now)

Viral Video : डान्सिंग आजीचा सोशल मीडियावर थाट, 78 वर्षीय कृष्णकुमारी तिवारीचा हा व्हिडीओ नक्की बघा...


मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral Videos) अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ करमणूकीची (Entertainment) मेजवानी असतात तर काही अतिशय भावनिक असतात. मात्र तुम्हाला खळखळून हसवतील असे अनेक व्हिडीओ धुमाकूळ घालत असतात. अनेक वेळा लोक त्यांच्या खास टॅलेंटचे व्हिडीओ बनवतात जसं की गाणी (Singing), नृत्य करणं (Dance), स्वयंपाक (Cooking) करणं हे व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरलही होतात. लोकांच्या पसंतीसही उतरतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही आनंदीत व्हाल सोबतच खळखळून हसाल.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झालेल्या या व्हिडीओमध्ये एक आजी डान्स करताना दिसतेय. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या आजीला पाहून प्रत्येकजण स्तब्ध आहे, अगदी या वयातही, ज्या प्रकारे ती आपल्या कमरेला हलवत आहे आणि नाचत आहे. एवढंच नाही तर आजीच्या मूव्हज इतक्या अचूक आहेत की जणू तिनं काही प्रशिक्षण घेतलं असेल. या व्हिडीओला 18 दशलक्षाहून अधिक व्हिव आणि 65 हजार कमेंट्स मिळाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

इंटरनेटच्या जगात धुमाकूळ घालत असलेल्या व्हिडिओमध्ये 78 वर्षीय कृष्णकुमारी तिवारी नाचताना दिसत आहेत.  कृष्णकुमारी यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. मात्र कुटुंब आणि समाजातील भीतीमुळे त्याचा छंद कधीच पूर्ण होऊ शकला नाही. म्हणूनच त्यांच्या मनातल्या मनात भावना दडपल्या गेल्या. आज नेपाळची ही महिला टिकटॉक स्टार आहे जी डान्स व्हिडीओ बनवून लोकांचं मनोरंजन करत आहे. तिचे व्हिडीओ पाहिल्यानंतर बरेच लोक तिची  स्तुती करतात याबद्दलही कृष्णकुमारी यांना प्रसन्न वाटतं. ती म्हणते मला डान्स करत मरायचं आहे.

कृष्णकुमारीनं सांगितलं की मी नृत्य करण्याची आवड नेहमीच दाबून ठेवली. मला माहित नाही की आज माझ्याबरोबर काय घडत आहे. मला असं वाटतं की प्रत्येक क्षणी मी नाचायला पाहिजे. मला या कामापासून कोणीही रोखू शकत नाही. माझी मुलंही आज माझा आनंद पाहून खूप आनंदित आहेत. आजींचं नृत्य पाहिल्यानंतर सर्वजण तिचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर कमेंट करताना लोक म्हणाले की असे व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला जीवन जगण्याचा नवीन दृष्टीकोन मिळतो.

संबंधित बातम्या

Video | आधी दूध पिलं नंतर घेतली मड थेरेपी, छोट्याशा गेंड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | त्याला रुग्णवाहिकेतून बाहेर काढलं, काही क्षणात स्ट्रेचरवरुन उठला अन् पळायला लागला, व्हिडीओ व्हायरल

भारतातील सर्वात तिखट मिरची लंडनच्या बाजारात, पंतप्रधान मोदी ट्विट करुन म्हणाले…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI