लग्नाच्या दिवशी नवरदेवाला म्हणाली, “तु येऊ नकोस!”, चिडलेल्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल

ती किती रागावलीये हे तिच्या हावभावावरून, आवाजावरून कळून येतंय.

लग्नाच्या दिवशी नवरदेवाला म्हणाली, तु येऊ नकोस!, चिडलेल्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल
bride groom video
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 21, 2022 | 12:09 PM

लग्नाच्या दिवशी वधू-वर फक्त आनंदी आणि उत्साही नसतात. ते लग्नाच्या दिवशी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल अस्वस्थ आणि काळजीत सुद्धा असतात. वधू-वरांसाठी हा दिवस खास तर असतोच पण तो तितकाच कठीण दिवसही आहे यात शंका नाही. नववधूच्या लग्नाच्या लूकपासून ते तिच्या प्रवेशापर्यंत सगळ्याच गोष्टींची चर्चा असते. असाच काहीसा प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालाय. ही नवरी नवरदेव उशिरा मंडपात उशिरा येतोय म्हणून रागात आहे आणि त्याला फोन करून “तु येऊच नको” असं म्हणतेय.

वधू वरासोबत कॉलवर बोलतीये, जिथे ती लग्नात वराच्या उशीरा येण्यावरून वाद घालत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाचा लेहंगा घातलेली नवरी नवरदेवाला वेळेवर न आल्याने रागावलेली दिसतीये.

ती टेन्शनमध्ये दिसते. तिचे शेवटचे काही शब्द ऐकू येत नसले तरी ती किती रागावलीये हे तिच्या हावभावावरून, आवाजावरून कळून येतंय.

नवरी म्हणते, “ट्रॅफिक नहीं मिलेगा क्या. येण्याची गरज नाही, प्लीज आता येऊ नकोस.” असं म्हणत ती इतकी चिडते की तु आता लग्नालाच येऊ नको असं म्हणते.

bridal_lehenga_designn नावाच्या अकाऊंटने ही पोस्ट शेअर केलीये. व्हिडिओ खूप लोकांना आवडलाय, अनेकजण यावर आपली प्रतिक्रिया देतायत. या व्हिडिओला हजारो लाईक्स सुद्धा मिळालेत.