
नवी दिल्ली : लग्नाचा दिवस कोणत्याही मुलीसाठी किंवा मुलासाठी खास असतो. लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात, पण जरा कल्पना करा की लग्नाआधी जर तुम्ही तुमच्या एक्स बॉयफ्रेंडची आठवण काढायला सुरुवात केली तर काय होईल. तुम्ही पाहू शकता की नवविवाहित वधू आपल्या एक्स बॉयफ्रेंडसाठी आपल्याच नवऱ्यासमोर गाणं गात आहे. बिचारा नवरा फक्त तिच्याकडे टक लावून पाहतोय. नवरदेवाच्या या प्रतिक्रियेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हा व्हिडिओ युट्यूबवर अनेक वेगवेगळ्या चॅनल्सवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी नवरीच्या ड्रेसमध्ये बसली आहे.
व्हिडिओमध्ये ती म्हणते की, तिला तिच्या Ex साठी एक गाणं गायचं आहे. Ex bf चे नाव विचारले असता मुलगी म्हणते, “मी एक्सचे नाव घेऊ शकत नाही, त्याची बदनामी होईल”.
यानंतर ती मुलगी अजय देवगनच्या चित्रपटातील ‘जीती थी जिसली लिए’ हे गाणं गायला सुरुवात करते. जवळच उभा असलेला नवरदेव मात्र हे सगळं शांतपणे बघत असतो.
सोशल मीडियावर या व्हिडिओवर लोकांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. एका युझरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘ओ भाऊ मला मारून टाक’. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘नवरदेव बिचाऱ्याची प्रतिक्रिया बघा’.
आणखी एका युझरने लिहिले की, ‘नवरदेव इतका सोडून का गेला नाही. हुंडा खूप मिळाला आहे असं वाटतंय.”