
ब्रिटेनच्या एका न्यायालयात सोमवारी, 24 फेब्रुवारी रोजी खळबळजनक चोरीची घटना उघड झाली. त्यामुळे इंग्लंडमध्येच नाही तर युरोपमध्ये एकच चर्चा सुरू झाली. चोरांनी ब्लेनहेम राजवाड्यातील 18 कॅरेट सोन्याचे टॉयलेट चोरीला गेले. हे महागडे सोन्याचे टॉयलेट इटलीचा लोकप्रिय कलाकार मोरिजियो कॅटेलन याने तयार केली आहे. या टॉयलेटला त्याने अमेरिका असे नाव दिले होते. 2019 मध्ये ऑक्सफोर्डशायर येथील ब्लेनहेम राजवाड्यातील एका प्रदर्शनात ते तिथे बसवण्यात आले होते. पण ते चोरीला गेले. या टॉयलेटची किंमत 6.06 दशलक्ष डॉलर म्हणजे 50 कोटींच्या घरात आहे. अद्याप सुद्धा हे टॉयलेट सापडले नाही. पोलिसांनाच अंदाज आहे की, या टॉयलेटचे तुकडे करून ते विक्री करण्यात आले असेल. या घटनेने युरोपमध्ये एकच खळबळ उडाले आहे.
चोरीसाठी मोठी योजना
ऑक्सफोर्ड क्राऊन कोर्टात याविषयी सरकारी वकील ज्युलियन क्रिस्टोफर केसी यांनी युक्तीवाद केला. सरकारच्या मते, ही चोरी करण्यासाठी सुनियोजीतपणे योजना आखण्यात आली आणि झटपट चोरी करण्यात आली. अत्यंत शांत डोक्याने या वास्तूची, सुरक्षेची संपूर्ण माहिती काढून ही चोरी करण्यात आली. चोरांनी 14 सप्टेंबर 2019 रोजी भल्या पहाटे 5 वाजता ही चोरी केली. ब्लेनहेम पॅलेसचा लाकडी दरवाजा तोडून चोरी घरात आले. या चोरीसाठी चोरांनी चोरीचेच वाहन आणले होते. इसुजू ट्रक आणि एक व्ही डब्ल्यू. गोल्फ ही दोन वाहनं त्यांनी चोरी करून आणली होती.
98 किलो वजनाचे टॉयलेट
ज्या ठिकाणी हे टॉयलेट बसवण्यात आले होते. अगदी त्याच ठिकाणी भिंतीला चोरांनी भगदाड पाडले. त्यांनी दरवाजा तोडला आणि सोन्याचे टॉयलेट पळवले. या टॉयलेटचे वजन 98 किलो असल्याचा दावा करण्यात येत आहे. टॉयलेट खेचल्यानंतर पाण्याचा पाईप तुटला. त्यामुळे या पॅलेसमध्ये पाणीच पाणी झाले. इतके जड टॉयलेट चोरांनी कसं पळवलं असेल यावर न्यायालयात मोठा खल झाला. चोरांनी टॉयलेटचे अनेक तुकडे करून ते विक्री केल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यात मायकल जोन्स, फ्रेडरिक सायनस, बोरा गुचूक आणि जेम्स शीन यांचा समावेश आहे. या संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या जानेवारीत आरोपींनी न्यायालयात हा गुन्हा केला नसल्याचे म्हटले आहे. अद्याप या चोरीचा कुठलाही सुगावा पोलिसांना लागलेला नाही.