अरे भई वाह! वायपर बिघडला होता म्हणून शक्कल लढविली, जुगाड असावा तर असा…

| Updated on: Oct 12, 2022 | 1:28 PM

निराश न होता कसं काम करायचं. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो जुगाड कसा केला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आहे.

अरे भई वाह! वायपर बिघडला होता म्हणून शक्कल लढविली, जुगाड असावा तर असा...
Desi jugaaad
Image Credit source: Social Media
Follow us on

“अरे भाई वाह!” असं म्हणाल तुम्ही हा व्हिडीओ बघून. देसी जुगाडच्या बाबतीत भारतीयांची बरोबरी कुणीच करू शकत नाही. आपल्याला चांगलं माहित आहे कुठे आणि कसा जुगाड करायचा. निराश न होता कसं काम करायचं. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो जुगाड कसा केला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आहे. कितीही अडचणी आल्या तरी प्रत्येक गोष्टीला नेहमीच पर्याय असतो हेही या जुगाडातून चांगलंच कळून येतं.

अनेक वेळा उत्तर प्रदेशातील खराब रस्त्यांवरून बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी हैराण होतात. या रस्त्यांमुळे बस ची हालत वाईट होते. मात्र, कर्मचारी आपले कर्तव्य बजावण्यासाठी आपापल्या परीने बसमधील त्रुटी सुधारत राहतात.

सोशल मीडियावरही एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मीरत रोडवेजच्या बसने विंड शील्डवर वायपर हलवण्यासाठी जुगाड बनवला आहे.

चालकाने एका धाग्यात पाण्याने भरलेली बाटली लटकवली आणि नंतर ती काम न करणाऱ्या वायपरमध्ये अडकवलीये. यानंतर चालकाच्या सीटजवळ धागा बांधण्यात आला. जेव्हा जेव्हा वायपरची गरज भासते, तेव्हा ड्रायव्हर तो धागा आपल्याकडे ओढतो.

या व्हिडीओमुळे बड्या बड्या इंजिनीअर्सनाही धक्का बसलाय. सोशल मीडियावर या देसी जुगाड व्हिडिओबद्दल बरीच चर्चा आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ लोकांसाठी आश्चर्यकारक आहे, पण जर कोणी जुगाड करत असेल तर काम सोपं होऊ शकतं.

हा व्हिडिओ @Gulzar_sahab नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. आतापर्यंत 12 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय आणि लाइक केले आहे.