Video : मांजरीच्या पिल्लाला लागलाय गेमचा नाद!, सात सेकंदाचा व्हीडिओ तुमचं निखळ मनोरंजन करेल…

| Updated on: Apr 25, 2022 | 1:51 PM

केवळ सात सेकंदाच व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हीडिओला दीड लाखांहून अधिकांनी लाईक केलंय. तर 11 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय. हा व्हीडिओ Yoda4ever नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.'निन्जा कॅट खेळताना हरवून गेली आहे', असं कॅप्शन याला देण्यात आलं आहे.

Video : मांजरीच्या पिल्लाला लागलाय गेमचा नाद!, सात सेकंदाचा व्हीडिओ तुमचं निखळ मनोरंजन करेल...
व्हायरल व्हीडिओ
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) विविध गोष्टी व्हायरल होत असतात. प्राण्यांचे व्हीडिओ तर आवडीने पाहिले जातात. असाच एक हृदयस्पर्शी व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मांजरीचं (Cat Viral Video) पिल्लू पाहायला मिळतंय. हे मांजरीचं पिल्लू टॅब्लेटसोबत खेळताना दिसतंय. एक मुलगी शेजारी बसली आहे आणि शेजारी ठेवलेल्या टॅबवर हे मांजरीचं गोंडस पिल्लू गेम खेळतंय. खेळता-खेळता हा लहानगा जीव सोफ्यावरून खाली पडतो. या केवळ सात सेकंदाच व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हीडिओला दीड लाखांहून अधिकांनी लाईक केलंय.

व्हायरल व्हीडिओ

एक हृदयस्पर्शी व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मांजरीचं पिल्लू पाहायला मिळतंय. हे मांजरीचं पिल्लू टॅब्लेटसोबत खेळताना दिसतंय. एक मुलगी शेजारी बसली आहे आणि शेजारी ठेवलेल्या टॅबवर हे मांजरीचं गोंडस पिल्लू गेम खेळतंय. खेळता-खेळता हा लहानगा जीव सोफ्यावरून खाली पडतो. या केवळ सात सेकंदाच व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हीडिओला दीड लाखांहून अधिकांनी लाईक केलंय. तर 11 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय. हा व्हीडिओ Yoda4ever नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.’निन्जा कॅट खेळताना हरवून गेली आहे’, असं कॅप्शन याला देण्यात आलं आहे. हा व्हीडिओ खूप पसंत केला जात आहे.

या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही मांजरल किती क्युट आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर मांजरीला पाहून मलाही गेम खेळण्याची इच्छा होत असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर काहींनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.

मांजर आणि कुत्र्याची मैत्री दाखवणारा आणखी एक व्हीडिओ पाहायला मिळत आहे. यात कुत्र्याला खाण्यासाठी दिलेलं खाद्य तो मांजरीला देतो. व्हीडिओ दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 83 हजार लोकांनी याला लाईक केलं. आहे.

संबंधित बातम्या

Video : छोटा पुष्पा!, “मै झुकुंगा नहीं साला…”, लहानग्याची निरागसता पाहून तुम्ही प्रेमात पडाल!

Video : एक सायकल अन् दोन ड्रायव्हर, आनंद महिंद्रा म्हणतात, “या एकजुटीची भारताला गरज”

कुसुमच्या ‘त्या’ नोटेवरच्या पत्राला विशालचं उत्तर, म्हणाला, “मै डोली लेके आऊंगा!”