शेतकरी बापाच्या घामाचं चीज झालं; पोरगं अधिकारी झालं आणि…

| Updated on: Apr 09, 2023 | 3:19 PM

आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि त्चया दिशेने आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी सांगितले की या परीक्षेत सतत पेपर असतात आणि त्यानंतर मुलाखत होते. त्यामुळे या काळात खूप दडपण येते आणि अनेक वेळा तणावामुळे पेपर खराब जातो.

शेतकरी बापाच्या घामाचं चीज झालं;  पोरगं अधिकारी झालं आणि...
Follow us on

मुझफ्फरपूर : उत्तर प्रदेशमधील पीएससीचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर यश मिळवलेल्या उमेदवारांच्या घरातील सदस्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या निकालात मुझफ्फरपूर जिल्ह्यातील राहुआ गावातील रहिवासी रामेश्वर शर्मा यांचा मोठा मुलगा आशुतोष कुमार याने उत्तर प्रदेशात सहावा क्रमांक मिळवून गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. आशुतोषचा निकाल आणि पोलीस उपअधीक्षक झाल्याची कळताच त्याच्या घरात आणि गावात आनंदाला पारावार उरला नाही. राहुलचे वडील रामेश्वर शर्मा शेती करतात.

मात्र आपल्या मुलाच्या यशाबद्दल बोलताना ते म्हणतात की, आशुतोष सुरुवातीपासूनच हुशार होता. त्याच्या हुशारीमुळेच आणि त्याच्या कष्टामुळेच आमच्या परिश्रमाच आणि कुटुंबाचा नावलौकिक वाढला आहे.

शिक्षण गावातच झाले

आशुतोषचे प्रारंभीचे शिक्षण गावातीलच सरकारी शाळेत झाले. राहुआच्या विश्राम सिंह हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर एलएस कॉलेजमधून दहावीच्या पुढचं शिक्षण घेतलं. त्यानंतर आशुतोष पुढील शिक्षणासाठी पश्चिम बंगालमधील वर्धमान विद्यापीठातून त्याने बी.टेक पदवी प्राप्त केली. आशुतोष सध्या बांगलादेशच्या सीमेवर सीमाशुल्क विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

परीक्षेतील यशामुळे गावात दिवाळी

आशुतोषच्या कुटुंबात वडील रामेश्वर शर्मा शेती करतात तर आई ममतादेवी गृहिणी आहे. आशुतोष आपल्या कुटुंबातील तीन भावांमध्ये सर्वात मोठा. आशुतोषने आपल्या यशाचे श्रेय त्याचे आई-वडील आणि कुटुंबातील सदस्यांना तसेच शिक्षकांना दिले आहे. या यशाने त्याचं सगळं गाव आनंदून गेलं. त्याच्या या यशानंतर सगळ्या गावात मिठाई वाटून सगळ्या गावाने आनंद व्यक्त केला. त्यामुले त्याच्या या यशाने गावाने दिवाळी साजरी केली.

ध्येय निश्चिती

या यशाबद्दल आशुतोष सांगतो की, तो कस्टम्समध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम करत असताना या परीक्षेची तयारी करत होता. तरुणांना संदेश देताना ते म्हणतात की त्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि त्चया दिशेने आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी सांगितले की या परीक्षेत सतत पेपर असतात आणि त्यानंतर मुलाखत होते. त्यामुळे या काळात खूप दडपण येते आणि अनेक वेळा तणावामुळे पेपर खराब जातो.