इवलुसं ते गोंडस कुत्रं, तुम्ही पाहाल तर म्हणाल, “असंच पाहिजे”

हा व्हिडीओ बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्हालाही असाच कुत्रा हवा आहे, असे सर्वजण म्हणतायत.

इवलुसं ते गोंडस कुत्रं, तुम्ही पाहाल तर म्हणाल, असंच पाहिजे
cute dog
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 30, 2022 | 2:28 PM

माणूस असो वा प्राणी, दोघांनाही समज असते. पुष्कळ वेळा प्राणी मनुष्यापेक्षा अधिक बुद्धिमान बनतात. विशेषत: जर व्हिडिओ कुत्र्याचा असेल तर प्रकरणच वेगळं. नुसते लोक पाहत नाहीत तर ते तो व्हिडीओ शेअर सुद्धा करतात. हा व्हिडीओ बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्हालाही असाच कुत्रा हवा आहे, असे सर्वजण म्हणतायत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा शेतात पिकाच्या मध्यभागी शिरला. त्याने एकामागे एक मक्याची झाडे दातांनी कापायला सुरुवात केली. त्याचा वेग इतका वेगवान आहे की तो इतर कोणत्याही मशीनला सहज हरवू शकतो.

याव्हिडीओत हा छोटासा कुत्रा शेतातील मोठमोठी झाडे काढण्यासाठी दातांचा वापर करताना दिसतोय. लोक ही क्लिप फक्त पाहत नाहीत तर ते मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.

ही क्लिप @manojpehul नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. बातमी लिहिताना दीड लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला असून पाच हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.