याला म्हणतात Perfect stunt; सरावाशिवाय ‘हे’ शक्यच नाही, एकदा ‘हा’ Viral video पाहाच

Dangerous Stunt : काहींना स्टंट करताना एवढा आत्मविश्वास येतो, की ते सहज स्टंट करू शकतात. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक माणूस धोकादायक टेकडीच्या माथ्यावरून बॅकफ्लिप मारताना दिसत आहे.

याला म्हणतात Perfect stunt; सरावाशिवाय हे शक्यच नाही, एकदा हा Viral video पाहाच
टेकडीच्या टोकावर धोकादायक स्टंट करताना युवक
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 14, 2022 | 11:01 AM

Dangerous Stunt : चित्रपटांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट पाहायला मिळतात. तुम्ही ‘मौत का कुआं’ पाहिला असेल, ज्यामध्ये स्टंटमन मोटारसायकल किंवा कारवर उभे राहून किंवा बसून धोकादायक स्टंट दाखवत असत, पण आजकाल कुठेही गेलात तरी कोणी ना कोणी तुम्हाला स्टंट करताना दिसेल. सध्या लोकांमध्ये स्टंटबाजीची क्रेझ खूप वाढली आहे. विशेषत: तरुणांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. मात्र, स्टंट करणे वाटते तितके सोपे नाही. यासाठी तुम्हाला कठोर सराव करावा लागतो. काहींना स्टंट करताना एवढा आत्मविश्वास येतो, की ते बिनधास्त आणि धोकादायक ठिकाणी सहज स्टंट करू शकतात. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक माणूस धोकादायक टेकडीच्या माथ्यावरून बॅकफ्लिप मारताना दिसत आहे.

तोल सांभाळून करतो स्टंट

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की तो माणूस जिथून टेकडीवर उभा आहे, तिथून खाली एक तीव्र उतार आहे जिथून तो खाली पडला तर काहीही होऊ शकते, पण त्याची पर्वा न करता तो तिथे स्टंट करण्याचा विचार करतो. टेकडीच्या अगदी काठावर उभा राहून, तो बॅकफ्लिप मारतो. हे करताना तो अजिबात चुकत नाही. त्याचा तोल बिघडला किंवा पाय घसरला तरी तो थेट टेकडीवरून खाली पडला असता, पण त्याने ज्या पद्धतीने परफेक्ट स्टंट केला, त्यावरून त्याने यासाठी कठोर सराव केला असावा, असे वाटत होते.

‘फक्त काही लाइक्स मिळविण्यासाठी…’

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर Havenreels नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 5 लाख 42 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 17 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी विविध कमेंट्स करत तरुणाचा स्टंट धोकादायक असल्याचे म्हटले आहे. एका यूझरने लिहिले आहे, की सोशल मीडियावर फक्त काही लाइक्स मिळविण्यासाठी आयुष्य का घालवायचे? तुम्हाला धोक्यात घालत आहेत.

आणखी वाचा :

‘चाचा ओss चाचा…’ हे आजोबा भलतेच जोशात आलेत, बहुतेक 50 वर्षानंतर भेटले असावेत! Funny video viral

दोघात तिसरा, आता पैसे विसरा…; पेट्रोल पंपावर असा काय लोचा होतो? पाहा Funny Video

Video : खाद्यपदार्थांवरचे प्रयोग काही थांबेना! आता Omeletteची ‘ही’ नवी Recipe होतेय Viral