गिटार घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेल्या मुलाने हे पंजाबी गाणं गायलं, कमाल व्हिडीओ

कतंच एका व्हिडीओमुळे लोक भावुक झालेत. दोन लोकांनी आपल्या आवाजात असा परफॉर्मन्स दाखवला जो आता इन्स्टाग्रामवर खूप पसंत केला जात आहे.

गिटार घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेल्या मुलाने हे पंजाबी गाणं गायलं, कमाल व्हिडीओ
delhi connaught place
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 03, 2022 | 2:02 PM

आपण भारतीय सर्व क्षेत्रात अत्यंत प्रतिभावान आहोत, हे वेगळं सांगायला नको. आपल्याकडे व्यावसायिक प्रशिक्षण न घेताही अनेक जण गायन-नृत्यात चमकतात. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओंमध्ये याचा पुरावा पाहायला मिळतो. अनेकदा आपण पाहतो की रस्त्याच्या कडेला असलेले अनेक लोक आपल्या परफॉर्मन्समधून पोट भरण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच एका व्हिडीओमुळे लोक भावुक झालेत. दोन लोकांनी आपल्या आवाजात असा परफॉर्मन्स दाखवला जो आता इन्स्टाग्रामवर खूप पसंत केला जात आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये कैद झालेल्या व्हिडिओमध्ये एक स्ट्रीट म्युझिशियन त्याच्या गिटारवर ‘मन भरेया’ हे लोकप्रिय गाणं गाताना दिसत आहे.

गिटार घेऊन जमिनीवर बसलेला मुलगा ‘मन भरेया’ हे प्रसिद्ध गाणे गातोय. समोर उभे असलेला एक दर्शक त्याच्यावर खूप प्रभावित होऊन त्याच्याबरोबर गाण्यासाठी पुढे येतो.

तो लगेच त्याच्या बरोबर गाऊ लागतो आणि हे पाहून अनेक जण थांबतात. समोर उभी असलेली व्यक्ती गाण्याचे बोल बोलू लागताच खाली बसलेला गिटारवादक आपला सूर छेडतो.

लवकरच या दोघांनीही सुमधुर आवाजात हे गाणं गाऊन लोकांची मनं जिंकली. हे प्रेक्षकांना आणि जाणाऱ्यांना आकर्षित करते. प्रेक्षकही आनंदाने मुलाच्या गिटार बॉक्समध्ये काही पैसे ठेवतात.

हा व्हिडिओ रणवीर ठाकूर नावाच्या युझरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, संगीतकाराची ओळख शिवम अशी झाली असून त्याच्यासोबत आलेल्या व्यक्तीचं नाव लव सिंह असं होतं.

योगायोगाने, त्यांच्या इन्स्टाग्राम बायोजॉजनुसार ते दोघेही अभिनेते आहेत. ऑनलाईन शेअर केल्यापासून या क्लिपला 17 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि 24 लाख लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते या गाण्याने मंत्रमुग्ध झालेत आणि त्यांनी भरभरून कौतुक केलं.