#MCDResults: नेटकरी म्हणतायत,”अय खालून यादी तपासा रे काँग्रेस आहे का”, सोशल मीडियावर मिम्सचा कहर!

काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झाल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे. यूजर्स मजेशीर मीम्स शेअर करत आहेत.

#MCDResults: नेटकरी म्हणतायत,अय खालून यादी तपासा रे काँग्रेस आहे का, सोशल मीडियावर मिम्सचा कहर!
mcd elections memes
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 07, 2022 | 1:47 PM

एक काळ असा होता की दिल्लीतल्या कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसचं वर्चस्व होतं, पण आता हा पक्ष तळाला गेला आहे. MCDच्या निवडणुकीत काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झाल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे. यूजर्स मजेशीर मीम्स शेअर करत आहेत.

आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष आघाडीवर आहे, तर दुसऱ्या स्थानावर भाजप आणि तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे.

आतापर्यंत आम आदमी पार्टीने 70 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत, तर भाजपनेही 50 पेक्षा जास्त उमेदवार जिंकले आहेत.

त्याचबरोबर आतापर्यंत काँग्रेसच्या केवळ 4 उमेदवारांना विजय मिळवता आला आहे. एक काळ असा होता की दिल्लीतल्या कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसचं वर्चस्व होतं, पण आता हा पक्ष तळाला गेला आहे.

MCD निवडणुकीत काँग्रेस अशा प्रकारे मागे पडल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे. युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन देत असून मजेशीर मीम्सही शेअर करत आहेत.

मीम्स शेअर करून कुणीतरी म्हणतंय की ‘खालून यादी चेक करा… खालून,’ कुणीतरी ‘भूमिगत होण्याची वेळ आली आहे’, असे म्हणत आहे.