दिल्ली पोलिसांवरही ‘पावरी गर्ल’चा जादू, छापेमारीनंतर व्हायरल झालं गमतीशीर ट्वीट

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून जेवढी चर्चा पावरी गर्लची झाली असेल (Delhi Police Interesting Tweet ), कदाचितच त्वढी आणखी कुठल्या गोष्टीची झाली असावी.

दिल्ली पोलिसांवरही पावरी गर्लचा जादू, छापेमारीनंतर व्हायरल झालं गमतीशीर ट्वीट
Delhi Police Tweet
| Updated on: Mar 08, 2021 | 11:55 AM

मुंबई : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून जेवढी चर्चा पावरी गर्लची झाली असेल (Delhi Police Interesting Tweet ), कदाचितच त्वढी आणखी कुठल्या गोष्टीची झाली असावी. इंटरनेटच्या जगात दनानीर मुबीनच्या एका छोट्याशा व्हिडीओने मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. प्रत्येक ठिकाणी त्याचीच चर्चा होऊ लागली. हेच कारण आहे की त्यांचं पावरी स्टाईलला लोकांनी डोक्यावर घेतलं. पावरी गर्ल प्रमाणेच सध्या दिल्ली पोलिसांचं ट्वीट पावरी गर्ल स्टाईलमुळे अचानक लोकांमध्ये चर्चचा विषय ठरला आहे (Delhi Police Interesting Tweet On Pawri Nahi Ho Rahi Hai Viral On Social Media).

दिल्ली पोलिसांनी एका प्रकरणात यश संपादित केल्यानंतर एक ट्वीट केलं. हे ट्वीट अतिशय गमतीशीर आहे. त्यामुळे हे चर्चेत आहे. दिल्ली पोलिसांनी बारमध्ये धाड टाकून 24 ‘हुक्के’ जप्त केले. यानंतर दिल्ली पोलिसांमी आपल्या ट्विटर हँडलवर लिहीलं ‘‘ये हम हैं… ये हुक्के हैं … और अब पावरी नहीं हो रही है.’ या मीमची सोशल मीडियावर धूम पाहायला मिळत आहे.

पाहा दिल्ली पोलिसांचं ट्वीट –

दनानीर मुबीन पावरी गर्ल

दनानीर मुबीन तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एका छोटासा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये दनानीर एका वेगळ्या अंदाजात पार्टीला पावरी म्हणत होती. तिचा हा अंदाज लोकांना इतका आवडला की सर्व ठिकाणी तिचेच चर्चे होते. दनानीरने हा व्हिजीओ तेव्हा रेकॉर्ड केला होता जेव्हा ती रस्त्यात काही मित्र-मैत्रिणींसोबत कारमध्ये पार्टी करत होती. दनानीरने आपल्या व्हिडीओत सांगितलं की “ये हमारी कार है, ये हम हैं और ये हमारी पावरी (पार्टी) हो रही है”.

हा व्हिडीओ चर्चेत आल्यानंतर यशराज मुखातेनेही दनानीरच्या स्टाईलला वेगळ्या अंदाजाच लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यांचा हा व्हिडीओ पाठवल्यानंतर सोशम मीडिया अनेक मीम्स बनवले जात आहेत. सोशल मीडियावर “पावरी हो रही हैं” ट्रेंड करत होता. तसेच, या व्हिडीओवर बॉलिवूड कलाकारही रिअॅक्शन देत आहेत. त्यानंतर सामान्य लोकांनीही यावर अनेक व्हिडीओ तयार केले आहेत.

Delhi Police Interesting Tweet On Pawri Nahi Ho Rahi Hai Viral On Social Media

संबंधित बातम्या :

OMG! अचानक सोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी अलोट गर्दी, व्हिडीओ व्हायरल

Video | मराठमोळ्या रिक्षावाल्याचं लावणी सम्राज्ञीलाही लाजवेल असे लावणी नृत्य

8 वर्षाच्या मुलाने गेम खेळून 24 लाख रुपये कमावले, तुम्हालाही हा गेम हमखास जमेल?