
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका राज्य प्रशासनिक सेवेतील अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार आणि काळ्या कृत्यांचा पर्दाफाश त्याच्या पत्नीने स्वतः केला आहे. खरेतर, एका महिलेने भोपाळ येथे कार्यरत असलेल्या उपजिल्हाधिकारी पतीविरुद्ध प्रशासनाकडे गंभीर तक्रारी केल्या आहेत. महिलेचा आरोप आहे की, लोकायुक्तांमार्फत करण्यात आलेला तपासात अडकलेल्या तिच्या पतीने भ्रष्टाचारातून प्रचंड संपत्ती कमावली आणि त्याच पैशाच्या जोरावर परवानगीशिवाय परदेशात अय्याशी करण्यासाठी जातो. तसेच, तिने पतीवर खुनाची धमकी दिल्याची तक्रारही केली आहे.
महिलेची पतीच्या कृत्यांबद्दल माहिती
उत्तर प्रदेशातील जालौन येथील रहिवासी तबस्सुम बानो मंगळवारी जनसुनवाईसाठी एसडीएम एलएन गर्ग यांच्यासमोर हजर झाल्या. यावेळी त्यांनी सांगितले की, भोपाळ मुख्यालयात कार्यरत उपजिल्हाधिकारी मोहम्मद सिराज मन्सूरी हे त्यांचे पती आहेत. मन्सूरी आपल्या पदाचा गैरवापर करतात. त्यांनी एसडीएम असताना प्रचंड रक्कम कमावली आणि नातेवाइकांच्या नावावर छिंदवाडा, इंदूर, जबलपूर येथे प्लॉट, घरे आणि लक्झरी वाहने खरेदी केली. याशिवाय, मौजमजा करण्यासाठी सरकारच्या परवानगीशिवाय इराक, दुबई आणि थायलंडला गेले.
वाचा: समीर चौघुले गेले, अशी बातमी आली अन्… स्वत:च्या मृत्यूची बातमी वाचली तेव्हा… नेमकं काय घडलं?
लोकायुक्त तपास आधीपासून सुरू
उपजिल्हाधिकारी असल्याने अधिकारी संभ्रमात पडले आणि कोणतीही कारवाई केली नाही. असे म्हटले जात आहे की, मन्सूरी सुमारे एक वर्षापूर्वी उज्जैन येथे एसडीएम होते. येथे त्यांच्यावर एका मशिदीला 3 लाख रुपये मिळवून दिल्याच्या आरोपाखाली लोकायुक्तांमार्फत तपास करण्यात आला. त्यानंतर त्यांची भोपाळला बदली झाली.
सुनावणी झाली नाही
तबस्सुम यांनी सांगितले की, सुमारे एक आठवड्यापूर्वी त्यांनी इंदूर येथे जनसुनवाईदरम्यान पती मन्सूरी यांची तक्रार केली होती. आता मंगळवारी त्या उज्जैन येथे तक्रार करण्यासाठी गेल्या, तेव्हा जिल्हा पंचायत सीईओने एसडीएमकडे आणि एसडीएमने तहसीलदारकडे पाठवले. महिलेचे म्हणणे आहे की, पुन्हा एकदा एसपीकडे तक्रार करण्यास सांगून मला परत पाठवले गेले. परंतु मन्सूरी यांच्या कार्यकाळाची आणि पासपोर्टची तपासणी केली तर सर्व सत्य समोर येईल. या प्रकरणात उपजिल्हाधिकारी मन्सूरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी कॉल उचलला नाही.
विवाहबाह्य संबंध उघड झाल्याने वाद
तबस्सुम यांच्या मते, 2008 मध्ये जेव्हा मन्सूरी तहसीलदार होते, तेव्हा त्यांचे लग्न झाले आणि एका वर्षानंतर मुलगा झाला. त्यानंतर बदली झाली, तेव्हा आम्ही कुटुंबापासून दूर दुसऱ्या शहरात राहायला गेलो. येथे मन्सूरी यांचे दुसऱ्या महिलांशी संबंध असल्याचे समजल्यानंतर वाद झाला, तेव्हा त्यांनी मला खुनाची धमकी द्यायला सुरुवात केली. यादरम्यान, पती मन्सूरी दुबई, बँकॉक आणि इराकला गेले. परदेशात जाताना ते अधिकृत सिम बंद करून त्या देशाची सिम घेत आणि परतल्यानंतर ती सिम तोडून टाकत. तबस्सुम यांनी तक्रारीशी संबंधित फोटो आणि व्हिडीओही उपलब्ध करून दिले आहेत.